शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या कारागृहात गुंडाची आत्महत्या

By admin | Updated: October 21, 2016 01:23 IST

गळफास घेतला : प्रेम प्रकरणात अटकेत

सांगली : प्रेम प्रकरणातून तरुणीची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी अटकेत असलेला बामणोली (ता. मिरज) येथील गुंड संदीप पांडुरंग सुर्वे (वय २६) याने सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे चार वाजता ही घटना उघडकीस आली. बरॅक क्रमांक चारमधील मोरीजवळील खिडकीला चादरीने गळफास घेतला. मात्र, आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. कुपवाडलगतच्या बामणोली येथील बहिणीकडे सुर्वे राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एका वृत्तवाहिनीचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून वावरत होता. त्याचे बामणोलीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. तिच्याशी विवाह करण्यासाठी त्याने नोंदणीही केली होती. याची माहिती त्याने कुपवाड पोलिस ठाण्यात दिली होती. सुर्वेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने, पोलिसांनी याची माहिती संबंधित तरुणीच्या घरी दिली. सुर्वे गुंड असल्याचे समजताच या तरुणीने लग्नास नकार दिला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. पोलिसांसमोर सुर्वेने संबंधित तरुणीशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, तिला त्रास देणार नाही, असे लिहून दिले होते. मात्र, पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने तिच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील संदेश पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार समजताच तरुणी व तिच्या वडिलांनी कुपवाड पोलिस ठाण्यासमोर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुर्वेला ताब्यात घेतले होते. तरुणीची बदनामी व विनयभंगासह तीन गुन्हे सुर्वेविरुद्ध दाखल केले होते. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली होती. १८ आॅक्टोबरला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्याला येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. कारागृहाच्यादुसऱ्या मजल्यावरील बरॅक क्रमांक चारमध्ये तो होता. बुधवारी सायंकाळी सर्व कैद्यांसोबत त्याने जेवण घेतले व रात्री झोपी गेला. पहाटे चार वाजता एक कैदी लघुशंकेसाठी शौचालयात निघाला होता. त्यावेळी त्याला मोरीजवळील खिडकीला सुर्वे गळफासाने लटकत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी भेट देऊन पाहणी केली. सुर्वेने चादर फाडून त्याच्या साहाय्याने गळफास घेतला होता. न्यायाधीशांसमोर कारागृहातच मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)