शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरच्या बालेकिल्ल्यात गणोश नाईकांची कसरत

By admin | Updated: August 20, 2014 01:34 IST

बालेकिल्ला असलेल्या बेलापूर मतदारसंघात या खेपेला राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांना चांगलीच कसरत करावी लागणार आह़े

नारायण जाधव - ठाणो
राजकीय सारीपटावरील सुंदोपसुंदी आणि पक्षीय हेवेदाव्यांमुळे आपला बालेकिल्ला असलेल्या बेलापूर मतदारसंघात या खेपेला राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांना चांगलीच कसरत करावी लागणार आह़े
एकेकाळी दक्षिण दिल्लीनंतर सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून बेलापूर मतदारसंघ ओळखला जात अस़े नवी मुंबई, मुंब्रा-कळवा-घोडबंदर-बाळकुम या ठाणो महापालिकेतील परिसरासह मीरा-भाईंदरचा यात समावेश होता़ मात्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बेलापूर मतदारसंघ विखुरला गेला़ सध्या नवी मुंबई महापालिकेचे वाशीच्या जुहू नगरपासून तुर्भे, सानपाडा, नेरूळ-बेलापूर्पयतच्या परिसराचा या मतदारसंघात समावेश होतो़ एकीकडे झोपडपट्टीतील श्रमिक मतदार तर दुसरीकडे पामबीच रोडसह वाशी, एनआरआय वसाहतीत राहणारा उच्चशिक्षित गर्भश्रीमंत मतदाराचा या मतदारसंघात समावेश आह़े
1995 पासून नाईकांचे बेलापूर मतदारसंघासह नवी मुंबई महापालिकेवर एकहाती वर्चस्व राहिले आह़े पक्ष कोणताही असो महापालिकेत सत्तेची चावी मात्र नाईकांच्या हातात राहिली आह़े यात अपवाद 1999 च्या विधानसभा निवडणुकीचा़ त्यावेळी शिवसेनेच्या सीताराम भोईर यांनी नाईकांचा अनपेक्षित असा पराभव केला होता़ यात भोईर यांच्यापेक्षा स्व़ आनंद दिघेंचा करिश्मा जास्त  होता़ पुनर्रचनेत बेलापूर मतदारसंघ युतीतील भाजपाच्या वाटय़ाला गेला़ 2क्क्9 मध्ये भाजपाने येथून सुप्रसिद्ध बिल्डर सुरेश हावरेंना उमेदवारी दिली़ त्यांनी नाईकांना अतिशय कडवी लढत दिली़ मनसेचे पप्पू महाले आणि 
काँग्रेसचे नामदेव भगत यानी बंडखोरी केली नसती तर कदाचित नाईकांचा बेलापूर मतदारसंघात निसटता पराभव झाला.
गेल्या पाच वर्षात नाईकांनी बेलापूर मतदारसंघातील आमदार निधीतील कामांशिवाय  मंत्री म्हणून केवळ बेलापूरच नव्हे तर नवी मुंबई महापालिका आणि सिडकोशी निगडित अनेक प्रश्नांचा पाठपुरावा केला आह़े बेलापूर विधानसभा क्षेत्रत नवी मुंबई महापालिकेतील 25 राष्ट्रवादीचे 25, शिवसेनेचे 8, काँग्रेेसचे 1क्, भाजपाचा एक आणि राष्ट्रवादीच्या तुर्भे स्टेअरच्या दोन नगरसेवकांचे वॉर्ड अर्धेअर्धे मोडतात़ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील महत्त्वाचा घटक असलेले माथाडी कामगारांचे दोन्ही नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे बेलापूर मतदारसंघाचे रहिवासी आहेत़ यातील शिंदे मंत्रिमंडळात आहेत़ राष्ट्रवादीचे असे एकहाती वर्चस्व असतानाही लोकसभेत येथून संजीव नाईक यांना 25 हजारांवर मतांची पिछाडी मिळाली़