शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भावी पत्नीची दिली ‘सुपारी’

By admin | Updated: February 19, 2015 01:25 IST

भावी पत्नीवर हल्ला करून अपंग करण्यासाठी एकाने गुंडांना दोन लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी : दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याने लग्न मोडण्यासाठी प्राध्यापिका असलेल्या भावी पत्नीवर हल्ला करून अपंग करण्यासाठी एकाने गुंडांना दोन लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुंडांनी त्याच्या भावी पत्नीस जबर मारहाणही केली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित संतोष अग्रवाल (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार रोहित मोहनसिंग कपाडिया (३०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), अनिल बाळू कानडे (३५, रा. सुस रोड, पाषाण) व चाँद गफुर शेख (२१, फुलेनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, रजनीश देविसिंग कपाडिया (२५, फुलेनगर, भोसरी) हा फरारी आहे. येरवडा परिसरात किराणा मालाचे एक व्यापारी आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न तळेगाव दाभाडे येथील रोहितशी ठरले होते. ते दोघेही पदवीधर असून, ही तरुणी येरवडा येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न होणार होते. परंतु रोहितने मुलगी पसंत नसल्याचे घरी सांगितले. तरी रोहितच्या कुटुंबीयांनी त्याच मुलीसोबत लग्न होईल, असे ठणकावले होते. त्यामुळे रोहितने या मुलीस अपंग करण्याच्या उद्देशाने तिला इ स्क्वेअर येथे नेले. सिनेमा पाहिल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर दोघेजण तरुणीच्या दुचाकीवर रेंजहिल्समार्गे जात होते. रोहितने लघुशंकेच्या बहाण्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ दुचाकी थांबवली. त्यावेळी गुंडांनी रोहितला किरकोळ मारहाण केली. त्यानंतर तरुणीस हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. तिला गंभीर जखमी अवस्थेत जहॉंगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्या तरुणीचा नवऱ्या मुलावरच संशय बळावला. तरुणीने वडिलांसह खडकी पोलिस ठाणे गाठले. परंतु खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. तरुणीच्या वडिलांनी थेट पोलिस आयुक्त सतीश माथूर यांची भेट घेतली. माथूर यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, परिमंडळ चारचे उपायुक्त मनोज पाटील यांनीही खडकी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)तरुणीला अपंग केल्यास तिच्यासोबत लग्न होणार नाही, या उद्देशाने गुंडांना मारहाण करण्याची सुपारी दिली होती. इतकेच नव्हे, तर तरुणीस मारहाण झाल्याची फिर्याद आरोपीनेच खडकी पोलीस ठाण्यात दिली होती.- मनोज पाटील, पोलीस उपायुक्त