शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

८९८ शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला; अनेक शाळांना मान्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 06:17 IST

मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर : २०१९ - २० च्या माहितीनुसार राज्यात ८९८ मान्यता नसलेल्या शाळा कार्यरत असून, या शाळा आरटीईच्या नियमांचे उल्लघन करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे

सीमा महांगडेमुंबई : राज्यात सध्या मान्यता नसलेल्या एकूण ८९८ अनधिकृत शाळा असल्याचे वास्तव २०१९-२० च्या यूडायस प्लसच्या माहितीतून समोर आले. यामध्ये पहिली ते पाचवी इयत्तेच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे. मान्यता नसलेल्या सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर जिल्ह्यांत असल्याचेही उघडकीस आले आहे. यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे.

राज्य सरकारतर्फे दरवर्षी शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील एकूण शिक्षणाची परिस्थिती जाणून घेण्याच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली म्हणजेच यूडायस प्लसकडे संकलित केली जाते. २०१९ - २० च्या माहितीनुसार राज्यात ८९८ मान्यता नसलेल्या शाळा कार्यरत असून, या शाळा आरटीईच्या नियमांचे उल्लघन करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये पहिली ते बारावीच्या सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश असून, पहिली ते पाचवीच्या अनधिकृत शाळांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूदशिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारची अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता अथवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविण्यात येत असेल, तर संबंधितांना एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृतरीत्या चालू राहिल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. 

मुंबई उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांनी जिल्हास्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून या शाळांची माहिती यूडायस प्लसमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प समन्वयक राजेंद्र पवार यांनी दिल्या आहेत. असे असूनही किती शाळांवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे, याबद्दल शंकाच आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

मुंबई पालिका क्षेत्रात सर्वांत जास्त २३० शाळा अनधिकृतयूडायस प्लसच्या माहितीनुसार, राज्यात मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे २३० शाळा अनधिकृत आहेत. मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्रात १६ शाळा मान्यतेशिवाय कार्यरत आहेत. म्हणजेच मुंबई जिल्ह्यात एकूण २४६ शाळा अनधिकृत आहेत. त्याखालोखाल पालघर जिल्ह्यात १६० , ठाणे १६२, तर नागपूर जिल्ह्यात ८१ शाळा मान्यतेशिवाय सुरू आहेत. पुण्यात ४२, औरंगाबादमध्ये १९, रायगडमध्ये १२, नांदेडमध्ये १३, तर जळगावात ११ शाळा अनधिकृत आहेत.

टॅग्स :Schoolशाळा