शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या दारातच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार!

By admin | Updated: May 15, 2015 01:26 IST

लग्नाला वर्षही उलटले नाही तोच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वांबोरीत गुरुवारी घडली

राहुरी (जि. अहमदनगर) : लग्नाला वर्षही उलटले नाही तोच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वांबोरीत गुरुवारी घडली. यामुळे संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळीनी सासरच्या घराची मोडतोड करून घरासमोरच अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने वांबोरीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच विवाहितेच्या पतीसह नातेवाइकांना अटक करण्यात आली आहे. पागिरे-पठारे वस्तीवरील माधुरी नितीन पागिरे (२०) हिचा विवाह जुलै २०१४ रोजी नितीन याच्याबरोबर झाला होता़ विवाहानंतर काही दिवसांतच माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत पती, सासू-सासऱ्यांकडून माधुरीचा छळ सुरू झाला. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी माधुरी माहेरला निघून गेली. शेवटी काहींच्या मध्यस्थीनंतर आठ दिवसांपूर्वी ती नांदण्यास सासरी आली होती़माधुरीचे घरातील लोकांशी रविवारी पुन्हा भांडण झाले़ त्यातूनच तिने विषारी औषध प्राशन केले़ तिला अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र गुरुवारी तिचा मृत्यू झाला. हे वृत्त माधुरीच्या माहेरी समजताच संतप्त नातेवाईक तडक माधुरीच्या सासरी येऊन धडकले.मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच नितीनसह त्याच्या कुटुंबीयांना अटक करून पोलीस ठाण्यावर आणले. त्यानंतर माहेरची मंडळी वस्तीवर पोहोचली, परंतु घरी कोणीच न सापडल्याने त्यांनी नितीनच्या घरातील वस्तूंची नासधूस केली़ तसेच माधुरीचा अंत्यसंस्कार घरातच करण्याचा आग्रह धरला़ त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने राहुरीतून आणखी पोलिसांची कुमक मागविण्यात आली़ परंतु संतप्त नातेवाइकांनी घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)