शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांना दिलेला शब्द खरा केला : प्रसन्न मोहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:16 IST

न्यूज १८ लोकमतच्या अँकर ज्ञानदा कदम हिने मोहिले यांची छोटेखानी मुलाखत ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात घेतली.

मुंबई : विदर्भातील शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना व आर्थिक समस्या कमी करण्यासाठी पेर्नोड रिकार्ड इंडिया या कंपनीतर्फे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नागपूरमध्ये करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मित्राला दिलेला शब्द प्रत्यक्षात आणला. पहिल्या टप्प्यातील ही गुंतवणूक असून, उत्पादनासाठी सहा हजार टन बार्लीची, ४० हजार एकर जमिनीची गरज असून, या उद्योगाचा फायदा विदर्भातील ९० हजार शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पेर्नोड रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड, कॉर्पोरेट अफेअर्स प्रसन्न मोहिले यांनी बुधवारी व्यक्त केला.  न्यूज १८ लोकमतच्या अँकर ज्ञानदा कदम हिने मोहिले यांची छोटेखानी मुलाखत ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात घेतली.

मोहिले म्हणाले की, भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर नाशिकच्या दिंडोरी येथील कंपनीपासून पेर्नोड रिकार्ड इंडियाची सुरुवात झाली. आज ३० ठिकाणी कारखाने आहेत. राष्ट्रीय सकल उत्पादनात ४० हजार कोटी रुपयांची भरभक्कम भर घालणाऱ्या या उद्योगातील आमच्या कंपनीने महाराष्ट्राला चार लाख कोटींचा महसूल दिला आहे. मक्यापासून होणाऱ्या उत्पादनासाठी ५० हजार मेट्रिक टन मक्याची गरज असते. एक लाख एकर क्षेत्रावर मक्याचे उत्पादन लागते. त्यामुळे आमची कंपनी केवळ महसूल नव्हे तर, रोजगारही मिळवून देते. एकूण नऊ लाख रोजगारनिर्मिती करताना सहा लाख रोजगार कृषी क्षेत्रात निर्माण होतील. 

मोहिले म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ४० वर्षे जुनी मैत्री आहे. फडणवीस प्रथम आमदार झाले तेव्हा एक दिवस माझ्याकडे आले. माझ्या मोटारीत बसून आम्ही निघालो. ते मला गडचिरोलीला घेऊन गेले. फडणवीस यांना गडचिरोलीतील आरोग्य केंद्रांबाबत तारांकित प्रश्न विचारायचा होता. त्यांची गोरगरिबांच्या प्रश्नांबाबतची तळमळ मला तेव्हा भावली, असेही ते म्हणाले.

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस