शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जागांवर मित्रपक्षांचे अर्ज

By admin | Updated: September 28, 2014 02:31 IST

भारतीय जनता पार्टीने आपले 261 उमेदवार जाहीर केले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी व शिवसंग्राम या पक्षांना 27 जागा सोडण्यात आलेल्या आहेत.

मुंबई : भारतीय जनता पार्टीने आपले 261 उमेदवार जाहीर केले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी व शिवसंग्राम या पक्षांना 27 जागा सोडण्यात आलेल्या आहेत. परंतु या मित्रपक्षांनी अर्ज दाखल करण्याबाबत केलेले दावे पाहिले तर भाजपाच्या वाटय़ाच्या किमान सात जागांवर मित्रपक्षांनी अर्ज केले आहेत. पुढील दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
भाजपाच्या नेत्यांबरोबर शनिवारी रिपाइंच्या रामदास आठवले यांची बैठक झाली. त्यांना आठ जागा सोडण्याचा निर्णय झाल्याचे व केंद्रात मंत्रीपदासह राज्यातील सत्तेत 1क् टक्के वाटा देण्याचे निश्चित झाल्याचे आठवले यांनी सांगितले.        
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, इस्लामपूर, कराड उत्तर आदि 15 मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीला मांड, दौंड, भूम-परांडा, गंगाखेड, कळमनुरी, देगलूर, पैठण, कन्नड, पारनेर, इंदापूर हे मतदारसंघ सुटल्याचे त्या पक्षाने सांगितले. 
 
आठवले यांना चेंबूर, विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पुणो कॅन्टॉनमेंट, मुंब्रा, अंबरनाथ, देवळाली व भांडूप या आठ जागा सोडण्यात आल्याचे त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले. याखेरीज अंधेरी पूर्व मतदारसंघातून रिपाइंच्या वतीने एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी अर्ज केला असून तेथे भाजपाने उमेदवार दाखल केला आहे.