शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 3:33 PM

कॅबिनेट विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास चर्चा

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी राजकीय वर्तुळात भेटीगाठींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 4 बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर या नेत्यांनी कॅबिनेटच्या विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या मंत्रिमंडळातील सात जागा रिक्त आहेत. या जागा लवकरच भरल्या जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकीकडे भाजपाचे आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे चार बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांनी जवळपास अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चार बंडखोर नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर अहमदनगरमधून विजयी झाले.लवकरच होणाऱ्या कॅबिनेट विस्तारात सात जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी शिवसेना, भाजपा आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कॅबिनेट विस्तारात भाजपा आमदार आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे, प्रशांत बंब यांना स्थान मिळू शकतं. राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनादेखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि बंडखोर नेते विजयसिंह मोहिते यांना राज्यपालपद दिलं जाऊ शकतं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSujay Vikheसुजय विखेAbdul Sattarअब्दुल सत्तारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलKalidas Kolambkarकालीदास कोळंबकरcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना