शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:59 IST

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. मंत्रि‍पदासाठी इच्छुक नेते नेतृत्वाकडे लॉबिंग करत आहेत. भाजपा आमदार देवेंद्र फडणवीस यांची भेट आहेत. त्यातच आज 'सागर' बंगल्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याचं समोर आले. राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली हे अद्याप समोर आलं नाही मात्र या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठीचं सत्र सुरू आहे. सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. रविवारी नागपूरात राजभवनात नव्या मंत्र्‍याचा शपथविधी पार पाडला जाईल अशी माहिती आहे. त्यातच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मनसे आणि भाजपा यांच्यातील जवळीक कायम चर्चेचा विषय बनली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार न उतरवता भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतरची विधानसभा निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली. मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. मनसेचे राजू पाटील यांना त्यांची जागा राखता आली नाही. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता मनसे भाजपा युतीची चर्चा आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथं शक्य होईल तिथं आम्ही मनसेला सोबत घेण्याचा विचार करू. आम्ही राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यासाठी सकारात्मक आहोत. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उघडपणे आम्हाला पाठिंबा दिला होता त्याचा आम्हाला फायदाही झाला. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत. निश्चित त्यांच्या काही उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यांना सरकारसोबत ठेवण्याचा आमचा विचार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. राज ठाकरे यांच्या मनसेला सरकारमध्ये सहभागी करून घेणार का असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला त्याला फडणवीसांनी हे उत्तर दिले होते. 

दरम्यान, ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानला पार पडला. या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रित केले होते. परंतु वैयक्तिक कारणासाठी राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यानंतर राज यांनी ट्विटरवरून फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनतील असं भाकीत वर्तवले होते. मागील काही वर्षात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री वाढली आहे. त्यामुळे या महायुती सरकारमध्ये मनसे असणार की नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शपथविधीच्या आधी राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली परंतु राजू पाटील यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आल्याचेही सांगण्यात येते.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुती