शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पळून गेलेल्या मुली परतल्या

By admin | Updated: October 10, 2014 05:45 IST

घरातून पळ काढून मुंबई गाठणाऱ्या कोकणातील दोन तरुणींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे.

ठाणे : घरातून पळ काढून मुंबई गाठणाऱ्या कोकणातील दोन तरुणींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. यातील एक २१ वर्षीय तरुणी नोकरी करण्यासाठी रत्नागिरीतले घर सोडून ठाण्यात आली होती, तर एका १७ वर्षीय तरुणीने पालक ओरडल्यामुळे ठाण्यातून कुर्ला गाठले होते. त्यांचे समुपदेशन केले असता हा प्रकार उघडकीस आला. पाली गावात राहणारी विद्यार्थिनी ५ सप्टेंबर रोजी राबोडी परिसरात ठाणे पोलिसांना आढळली. तिला रडताना पाहून पोलिसांनी तिची चौकशी केली. मात्र तिने पोलिसांना काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिला चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या स्वाधीन केले. पोलीस शिपाई प्रतिभा मनोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगून तिला बोलते केले. तेव्हा तिने ठाण्यातील तिच्या एका मैत्रिणीने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. त्यानुसार, ती ४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतून ठाण्यात आली होती. पण मैत्रिणीशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला घरी पाठवले.राबोडी पोलीस ठाण्यात एक १७ वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. घरात काम करीत नसल्याने तिची आई तिला ओरडली होती.तिचा मोबाइल फोन चालू होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले असता ती कुर्ल्यात असल्याचे समजले.