शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार कुटुंबीय

By admin | Updated: February 26, 2015 01:59 IST

रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मा

मुंबई : रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे न्यायालयाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र ही नुकसान भरपाई घेण्यासाठी अनेक कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागते. गेल्या चार वर्षांत अशा तऱ्हेने नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पाच हजार रेल्वे अपघातग्रस्तांचे कुटुंबीय असल्याचे समोर आले आहे.रेल्वे प्रवासात वर्षाला चार ते पाच हजार प्रवाशांचे अपघात होतात. यात अनेक प्रवासी ठार तर काही प्रवासी जखमीही होतात. अशा प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी रेल्वे न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते. रेल्वे तिकीट किंवा पास असणारा प्रवासी गाडीत चढताना किंवा उतरताना पडला तसेच डब्यात दरवाजाजवळ उभा असणारा प्रवासी तोल जाऊन पडला तर अशा प्रवाशालाच किंवा त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. यामध्ये ठार झालेल्या प्रवाशाच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त चार लाखांपर्यंत तर जखमी प्रवाशाला आखून दिलेल्या नियमानुसार एक लाखापासून ते चार लाखांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रवासी किंवा त्यांच्या नातेवाइकाला रेल्वे न्यायालयाकडे मात्र खेटा माराव्या लागतात आणि यातच त्यांचे आयुष्य जाते. अशा तऱ्हेने २0११ पासून ते २0१४ पर्यंत नुकसान भरपाईच्या एकूण ५ हजार ८५ केसेस प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. २0११ साली १,२११ केसेस प्रलंबित होत्या. हीच संख्या २0१४ मध्ये वाढून १,२६८ एवढी झाली आहे. याबाबत रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशनचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले की, या केसेस लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. नुकसान भरपाईसाठी त्या प्रवाशाला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट किंवा पास सादर करणे महत्त्वाचे असते आणि हाच पुरावा काही वेळेला प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना सादर करताना डोकेदुखी ठरत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे आता रेल्वेकडून नुकसान भरपाई देण्याच्या कायद्यात बदल करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये अपघात झाल्यास भरपाई न देण्याची तरतूद करण्याचा विचार केला जात आहे.