नागपूरमध्ये आगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: May 23, 2014 11:42 IST2014-05-23T08:45:20+5:302014-05-23T11:42:41+5:30

नागपूरमधील गोकुळपेठ परिसरात एका इमारतीच्या लिफ्टमध्ये लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

Five people die in Nagpur fire | नागपूरमध्ये आगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये आगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू

ऑनलाइन टीम

नागपूर,दि. २३ - नागपूरमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. मृतांमध्ये तीन महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे.

गोकुळपेठ परिसरात अंजिक्य प्लाझा ही इमारत असून या इमारतीच्या पार्किंग परिसरात गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीचे लोण इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचू लागल्याने इमारतीच्या रहिवाशांना टॅरेसच्या दिशेने धाव घेतली. मात्र पहिल्या मजल्यावर राहणा-या सीरिया कुटुंबाने लिफ्टने तळमजला गाठण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे शॉर्टसर्किट होऊन लिफ्टमध्येही आग लागली व या आगीत सीरिया कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सलीला, रागिणी व श्रृती या महिलांचा तर निरांश व शाहना या चिमुरड्यांचा समावेश आहे . या दुर्घटनेत सीरिया कुटुंबातील एक व्यक्ती मात्र आश्चर्यकारकरित्या बचावल्याचे समजते. महिला व लहान मुलं लिफ्टने बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना सीरिया कुटुंबातील एका व्यक्तीने पहिल्या मजल्यावरुन तळमजल्यावर उडी मारल्याने ती व्यक्ती बचावल्याचे समजते. दरम्यान, पार्किंगमधील दुचाकी गाड्या या आगीत जळून खाक झाल्या असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

Web Title: Five people die in Nagpur fire