शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बिले थकविल्याने पहिला डिजिटल जिल्हा ‘आॅफलाइन’

By admin | Updated: May 25, 2017 01:57 IST

राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूरची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या

मंगेश व्यवहारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूरची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यातील डोंगरगाव, बेलदा व ब्राह्मणी येथील शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. मात्र बीएसएनएलची देयके थकविल्यामुळे सध्या जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं.चे वायफाय बंद पडले आहे.राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये नागपूरची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. शहरासह १३ तालुक्यांमध्ये एकूण १६०० किमी आॅप्टिकल फायबर केबल टाकून ग्रामपंचायतींना कनेक्ट करण्यात आले होते. ३० कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतसह प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेसह अन्य संस्था व नागरिकांना दर्जेदार इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली होती. त्यामुळे लोकांना अनेक सेवा रांगा न लावता आॅनलाइन मिळत होत्या.दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यंत्रणा फार काळ टिकू शकली नाही. आज जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं. चे वायफाय बंद पडले आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून पुरविण्यात आलेली ही सेवा बिल थकीत असल्याने ठप्प आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून आकडेवारीनुसार १४ एप्रिलपर्यंत ३०५ ग्रा.पं.मध्ये ही सेवा सुरू होती. या ग्रा.पं.वरसुद्धा बिल थकीत होते. त्यामुळे आज यातीलही अनेक ग्रा.पं. ची वायफाय सेवा बंद पडली असल्याची माहिती आहे.