शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

"आयडीयल"चा हणमंत मिरकुटे नीट परीक्षेत बायोलॉजीत देशात प्रथम

By admin | Updated: July 5, 2017 03:59 IST

येथील आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजीचा हणमंत मिरकुटे बायोलॉजीत ३४५ गुण मिळवून भारतात सर्वप्रथम आला़ आंचल काबरा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजीचा हणमंत मिरकुटे बायोलॉजीत ३४५ गुण मिळवून भारतात सर्वप्रथम आला़ आंचल काबरा नीट परीक्षेत ६६३ गुण मिळवून मराठवाड्यात सर्वप्रथम आली़ नीट परीक्षेत देशात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा आयडीलच्या मिरकुटे याने बायोलॉजीत ३ गुण जास्त मिळविले आहेत, हे विशेष़नीट बरोबरच आयडीयलच्या विद्यार्थ्यांनी एम्स, जिपमरसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतही गगनभरारी घेतली आहे़ आयडीयलच्या ३२५ विद्यार्थ्यांनी बायोलॉजीत ३६० पैकी ३०० पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत़ २४७ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत ५०० पेक्षा जास्त तर ५२३ विद्यार्थ्यांनी नीटमध्ये ४५० पेक्षा जास्त गुण मिळवून वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश निश्चित केला़ क्लासच्या सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हणमंत मिरकुटे ३४५, आवेज चोईन ३४२, आंचल काबरा ३३७, अपूर्वा चव्हाण ३३६, रोहीत चव्हाण ३३६, कांचन गंगेवार ३३५, गजश्री गुट्टे ३३२, कपिल मरशिवणे ३३१, आदित्य कमटलवार ३३१, अश्विनी राठोड ३३०, नसा़ीरोद्दीन शेख ३३० आणि मुस्कान शेख याने ३३० गुण पटकावले आहेत.आजपर्यंत आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजीच्या जवळपास ३,५०० विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविला आहे़ जिपनर संस्थेने घेतलेल्या परीक्षेत आयडीयलचा अनिरूद्ध काबरा देशात ४० वा आला, तर गजश्री गुट्टेने ओबीसी प्रवर्गातून ८२ वा क्रमांक पटकाविला़ टीम आयडीयलचे प्रा़ नरेश भोसले, प्रा़ डॉ़ महेश पाटील, प्रा़ डॉ़ प्रभाकर देशमुख, प्रा़ डॉ़ शिवप्रसाद, प्रा़ प्रदीपसिंह कुशवाह, प्रा़ चिराग, प्रा़ रामकिशन, प्रा़ रामप्रसाद, डॉ़ मद्युश्री राऊत, प्रा़ जितेंद्र चव्हाण, प्रा़ डॉ़ स्मिता भट्टड, व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील, शेख सादीक, रामदास कांबळे, प्रशांत सूर्यवंशी, विराज पालमकर, संतोष पाटील, भास्कर पाटील आदींनी गुणवंतांचे कौतुक केले़ (वाणिज्य वार्ता)"आयडीयल"च्या लातूर शाखेचाही श्रीगणेशा"आयडीयल"तर्फे गतवर्षी लातूर शाखा उघडण्यात आली़ या शाखेत एम्स, जिपमर, नीट परीक्षेची सखोल तयारी करून घेण्यात आली़ प्राध्यापकांच्या तंत्रशुद्ध शिकवणीमुळे आयडीयलच्या लातूर शाखेचा विद्यार्थी ऋषिकेश केंद्रेने नीट परीक्षेत ६४३, प्रियंका काबराने ६४१ गुण मिळविले़ तर विवेक शामते याने एम्स परीक्षेत २३ वा क्रमांक मिळविला़ नेहा बास्टे एसटी प्रवर्गात २८ वी आली़ तर ऋषिकेश कणकवाडने ४१ वा क्रमांक मिळविला़ ओबीसी प्रवर्गात महेश ढाणे १३२, आकाश होनराव ३१२ यांनी यश मिळविले़ आनंद सरकटे याने एसटी प्रवर्गात ५१ वे स्थान मिळविले़ अनुजा नवले हिने एम्समध्ये यश मिळविले़ याशिवाय संजना संदीप मास्त, उत्कर्षा खामकर यांनी जिपमर परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे़