साडेपाचव्या वर्षीच मिळणार पहिलीत प्रवेश; शाळा प्रवेशाचे वय केले शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:58 AM2020-09-19T01:58:47+5:302020-09-19T06:51:45+5:30

२०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला.

The first admission will be given only in the year and a half; School entry age relaxed | साडेपाचव्या वर्षीच मिळणार पहिलीत प्रवेश; शाळा प्रवेशाचे वय केले शिथिल

साडेपाचव्या वर्षीच मिळणार पहिलीत प्रवेश; शाळा प्रवेशाचे वय केले शिथिल

googlenewsNext

मुंबई : राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे.
२०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला.
ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप/नर्सरीत प्रवेश घेता येईल. याचा अर्थ अडीच वर्षांच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत ६ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल. कमी वयात शाळा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. २०२१-२२ पासून हा नियम लागू होईल.
शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयात शिथिलता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. प्रवेशासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य उपाययोजना हाती घेण्यासाठी याचसंदर्भात शिक्षण संचालकांची (प्राथमिक) एक सदस्यीय समितीदेखील नेमण्यात आली होती.
नियुक्त समितीच्या शिफारशीनुसारच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुलाला वयाच्या अडीचव्या वर्षी प्ले ग्रूप/नर्सरीला तर वयाच्या साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीला प्रवेश मिळू शकेल.

मुख्याध्यापकांचा अधिकार घेतला काढून
या आधी ३० सप्टेंबरपर्यंत अनुक्रमे तीन आणि सहा वर्षे वय पूर्ण करणाऱ्या मुलांना अनुक्रमे प्ले ग्रूप/नर्सरीत प्रवेश दिला जात होता आणि प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीतजास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. आता मुख्याध्यापकांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे.

Web Title: The first admission will be given only in the year and a half; School entry age relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा