शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या आत्महत्यांवर उपाय सापडेना!

By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST

कृषीमंत्र्यांची अगतिकता; नैराश्य घालविण्यासाठी जोडधंदा करण्याचा सल्ला.

अकोला : राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, शंभर टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकर्‍यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपुरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी कृषीमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात खडसे म्हणाले, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हे शेती क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून, शेतकर्‍यांतील नैराश्य घालविण्यासाठी व्यापकतेने काम करावे लागणार आहेत. शेतकर्‍यांनी शेतीपुरक जोडधंदा, प्रक्रिया उद्योग, दुग्धोपादनासारखे व्यवसाय अधिक वृध्दींगत करण्यावर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले. * शेतीसाठी उपाययोजनाशेतकर्‍यांना ४0 शेळ्या आणि दोन बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकर्‍यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सुक्ष्म, सरंक्षित सिंचनासाठी शेततळ्य़ांची योजना नव्याने राबविण्यात येतील. याकरीता २0 लाखाचे अनुदान शेतकर्‍यांना दिले जाणार आहे. शेततळ्य़ातून पाणी घेण्यासाठी सौरउज्रेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१0 लाखाचे अनुदान दिले जाईल. सुक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसात हे अनुदान त्यांना मिळेल. शेतीसंबधी हजारो प्रलंबीत तक्रारीचा निपटारा करण्यासाठी राज्यात छोटी न्यायालये स्थापन्याचे प्रयत्न सुरू असून, जिथे शेत तिथे खडीकरणाचा रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माती परिक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकर्‍यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.