शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: June 10, 2016 01:21 IST

उजनी धरणातील बॅकवॉटरमधून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

राजेगाव : परिसरात उजनी धरणातील बॅकवॉटरमधून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदा प्रथमच राजेगाव परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उजनी धरणातील बॅकवॉटरमधून पाणीउपसा करण्यासाठी करावयाच्या जलवाहिनी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही, तरीही यंदा वरुणराजा बरसेल आणि उजनी धरण १०० टक्के भरेल, हा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना उजनी धरणाचे बॅकवॉटर वरदान ठरले आहे. १९७६ साली उजनी धरण झाल्यानंतर या भागातील काळ्याभोर पिकाऊ (मळशीच्या) जमिनी पाण्याखाली गेल्याने या परिसरातील शेतकरी संकटात सापडला होता. परंतु, नंतर शेतकऱ्यांनी उजनी धरणातील बॅकवॉटरमधील पाण्यावर जलवाहिनी टाकून कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हळूहळू सधन होऊ लागला. सुरुवातीला पाच-दहा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जलवाहिन्या टाकल्या. नंतर कालांतराने प्रत्येकाने स्वतंत्र जलवाहिन्या टाकल्या. या दोन-तीन वर्षांत याचे प्रमाण वाढत जाऊन एका शेतकऱ्यांने दोन-दोन जलवाहिनी टाकल्याचे दिसून आले. एकट्या राजेगावमध्ये जवळपास ३०० ते ३५० जलवाहिन्या असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. राजेगाव येथील शेतकरी शशिकांत वाघमारे म्हणाले, की यंदा भीमा नदी कोरडी पडली आहे तरीही यंदा चांगला पाऊस पडून उजनी धरण १०० टक्के भरेल, याची आशा वाटते. आम्ही पाच इंच आकाराच्या ८०० पाईप टाकून जुन्या राजेगाव ते कोशिमघरपर्यंत पाईपलाईन केली आहे. साधारणपणे त्यासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.