शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍याला लाच मागणार्‍या तलाठी व कोतवालाविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: May 31, 2014 01:10 IST

वडिलोपार्जित शेती नावावर करण्यासाठी शेतकर्‍याला मागीतली ५ हजार रुपयांची लाच; तलाठी व कोतवालाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : वडिलोपार्जित बारा एकर शेतीपैकी अडीच एकर शेती तक्रारकर्त्याच्या नावावर करण्यासाठी शेतकर्‍याला ५ हजार रुपयांची लाच मागणार्‍या तलाठी व कोतवालाविरुद्ध शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना संशय आल्याने ते फरार झाले. मूर्तिजापूर येथील तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांचे नावे असलेल्या बारा एकर शेतीपैकी अडीच एकर शेती तक्रारदाराला त्याच्या नावे करावयाची असल्याने त्याने मूर्तिजापूर तलाठी कार्यालयात अर्ज केला. येथील तलाठी ऊर्मिला विश्वनाथ गव्हाळे हिने शेती नावे करण्यासाठी तक्रारदारास ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने २ हजार रुपयांची लाच दिली. उर्वरित ३ हजार रुपयांची रक्कम देणे बाकी असल्याने तलाठी ऊर्मिला गव्हाळे हिने २६ मे रोजी तक्रारकर्त्यास फोन करून ३ हजार रुपये हिरपूरचे कोतवाल देवीदास तायडे यांना देण्यास सांगितले. दरम्यान तक्रारकर्त्याने ३ हजार रुपयांची रक्कम जास्त होत असल्याचे सांगून, यातील काही रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार तलाठी ऊर्मिला गव्हाळे हिने ५00 रुपये कमी करून २५00 रुपये कोतवालाजवळ देण्याचे सांगितले. त्यापूर्वी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली आणि ते कोतवालाकडे २५00 रुपयांची रक्कम घेऊन गेले. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला; परंतु कोतवालास संशय आल्याने त्याने लघुशंकेस जात असल्याचे कारण देत, पळ काढला. तलाठी ऊर्मिला गव्हाळे व कोतवाल देवीदास तायडे यांच्यावर कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार ३0 मे रोजी गुन्हा दाखल केला.