शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात रंगला पशुपतीनाथांचा महोत्सव

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

हजारो वर्षे जुनी परंपरा, वृषभराजांनी घेतले दर्शन

जयदेव वानखडे /जळगाव जामोद (बुलडाणा)एक हजार वर्षाची परंपरा लाभलेला पशुपतीनाथ महोत्सव सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सातपुड्यामध्ये पारंपारिक पध्दतीने साजरा झाला. पश्‍चिम वर्‍हाडासह खान्देशातील शेकडो वृषभराजांना शेतकर्‍यांनी परंपरागत पशुपतीनाथाचे दर्शन घडवून, वर्षभर राबणार्‍या या मुक्या जिवाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.नवरात्रामध्ये घटस्थापनेनंतर येणार्‍या पहिल्या सोमवारी हा महोत्सव असतो. या दिवसाला शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्व असते. बैलगाड्या, छकडे घेऊन मोठय़ा प्रमाणात शेतकरी सातपुड्यात दाखल झाले. याठिकाणी बैलांचे स्नान करायचे, त्यानंतर पशुपतीनाथाचे दर्शन करून अंगारा लावायचा आणि गुळाचा प्रसाद वाटला की, वर्षभर बैलावर नैसर्गिक आरिष्ट येत नाही, त्यांना रोगराई होत नाही, असा विश्‍वास दृढ शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळेच शेकडो वर्षापासून या महोत्सवाची परंपरा अविरत पणे सुरू आहे. आकोट, तेल्हारा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मुक्ताईनगर आणि सातपुड्याच्या कुशीतील सर्व गावांमधून शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने आपआपल्या बैलगाड्या घेवून या महोत्सवात सहभागी झाले. जळगाव तालुक्याच्या उत्तरेस १0 कि.मी. अंतरावर सातपुड्यात पशुपतीनाथाचे पुरातन मंदिर वसले आहे. हे मंदिर म्हणजे पुरातन वास्तू आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. काळाच्या ओघात मंदिराची पडझड झाली; मात्र प्रवेशव्दार सुस्थितीत आहे. निसर्गरम्य परिसर, तुडूंब भरलेली धरणे आणि झुळझुळ वाहणार्‍या नद्या सर्वांनाच आकर्षित करतात. या महोत्सवासाठी जवळपास ३ हजार शेतकरी बैलगाड्या घेवून आले होते. वर्षभर काबाडकष्ट करणार्‍या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होता यावे, म्हणून ज्यांच्या घरी बैलजोडी आहे, असा प्रत्येक शेतकरी या महोत्सवात सहभागी होतो.