शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकर्‍यांचा हरितगृह उभारणीवर भर!

By admin | Updated: August 17, 2014 00:16 IST

साकोली कृषी विज्ञान केंद्र व एमएफकेव्ही देणार शेतकर्‍यांना देणार प्रशिक्षण.

अकोला : संरक्षित शेती या संकल्पनेला विदर्भातील शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता विदर्भातील शेतकरी मोठय़ा संख्येने हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत आहेत. शेतकर्‍यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील कृषी विज्ञान कें द्र व राहुली येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे.हरितगृहामध्ये तापमान, आद्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न, पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक, पिकांच्या अवस्थेनुसार कमी अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कर्बाम्ल इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न, उघड्या शेतापेक्षा बरेच जास्त उत्पादन घेतले जाते. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉलीहाऊसचा वापर केला जातो. पॉलीहाऊसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येते आणि मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळवारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर परिणामकारक उपाययोजना करता येतात. या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पादनात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने, या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. आता तर विदर्भातील शेतकर्‍यांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह, हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फुलशेती, भाजीपाला लागवड, तसेच हरितगृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदीचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.कृषी विज्ञानकेंद्र, साकोली येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी नवीन तंत्रज्ञानामुळे बिगरमोसमी उत्पादन घेता येत असल्याचे सांगुन त्यातुन मिळणार्‍या उत्पादनांना चांगले दर मिळत असून संशोधन, दुर्मीळ वनस्पतीचे संगोपन, तसेच बीजनिर्मीती व रोपनिर्मितीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे सांगीतले. येत्या २0 व २१ ऑगस्ट रोजी साकोली येथे शेतकर्‍यांना दोन दिवस तंत्रज्ञान अवगत करू न दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.