शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष घेतले!

By admin | Updated: June 6, 2015 01:27 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार शेताचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष प्राशन केले.

अकोलाबाजार (यवतमाळ) : न्यायालयाच्या आदेशानुसार शेताचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष प्राशन केले. यवतमाळ तालुक्यातील घाटाना (लोणी) येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.विषप्राशन केलेल्या बाबूलाल राठोड (६०) यांच्यावर यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणी (रोहणा) शिवारातील सर्वे नं. १० मधील शेताचे वाटप १९९१ मध्ये २३ भूमिहिनांना करण्यात आले होते. लाभार्थ्यांना सातबारा मिळाला. मात्र ताबा मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने १३ जानेवारी २०१५ रोजी या शेतकऱ्यांना शेताचा ताबा देण्याचा आदेश दिला. त्यानुसार शुक्रवारी मंडळ अधिकारी एस. ए. राणे, तलाठी चौधरी, वडगाव (जंगल) पोलीस ठाण्याचे ठाणेदार जी. एस. खारडे आदी शेतात पोहोचले. मनोहर राठोड आणि गीता पवार यांच्यानंतर शामराव गेडाम (लोणी) यांना ताबा देण्यासाठी अधिकारी बाबूलाल राठोड यांच्या शेतात पोहोचले. त्यावेळी बाबूलाल यांनी मी १९९१ पूर्वीपासून कसत असलेली दोन हेक्टर शेतजमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली. ही जमीन मधुकर येरावार यांच्याकडून घेतल्याचे ते सांगत होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत कारवाई सुरू केली.च्कसत असलेली जमीन हातातून जात असल्याचे पाहून बाबूलाल शेतातील झाडाकडे धावत सुटले. तेथील औषधाच्या बाटलीतील विष प्राशन केले. च्अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसही चक्रावले. त्यानंतर जमीन ताब्यात घेण्याची कारवाई थांबवण्यात आली. पोलिसांनी बाबूलाल यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.