शेतकरी बोगस बीटी बियाण्यांच्या मोहात!

By Admin | Updated: June 9, 2014 01:18 IST2014-06-09T01:18:53+5:302014-06-09T01:18:53+5:30

मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, तो काहीच दिवसांत विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी बियाण्यांची जोमात खरेदी सुरू केली आहे.

Farmer bogs seeds! | शेतकरी बोगस बीटी बियाण्यांच्या मोहात!

शेतकरी बोगस बीटी बियाण्यांच्या मोहात!

बीजी-३ चा गोरखधंदा जोमात : कृषी विभागाची करडी नजर 
जीवन रामावत - नागपूर
मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, तो काहीच दिवसांत विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी बियाण्यांची  जोमात खरेदी सुरू केली आहे.
मात्र त्याचवेळी मोठय़ा प्रमाणात बोगस बीटी बियाणे बाजारात दाखल झाले आहे. यात बीजी-३ (आरआर) या कापूस बियाण्याची जोरदार चर्चा  आहे. बीजी-३ या बियाण्याला अजूनपर्यंत केंद्र सरकार व जेनेटिक इंजिनिअरिंग अँडव्हायझरी कमिटीकडून विक्रीची परवानगी मिळालेली नाही. मात्र  असे असताना या बियाण्याच्या नावाखाली बोगस बीटी बियाण्याची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे. 
नागपूर विभागात सोयाबीन व कापसाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे. त्यानुसार यंदा संपूर्ण विभागात सुमारे ३ लाख ७८ हजार ३५0 हेक्टरमध्ये  सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज आहे; शिवाय ३ लाख २४ हजार ७00 हेक्टरमध्ये कापसाची लागवड होणार आहे. यासाठी २ लाख ८३ हजार  ४७0 क्विंटल सोयाबीन व ८ हजार १६८ पाकीट बीटी कापूस बियाणे लागणार आहेत. गत काही वर्षांत शेतकर्‍यांमध्ये बीटी बियाण्यांविषयी फार मोठे  आकर्षण वाढले आहे. यामध्ये बोलगार्ड या कंपनीने आतापर्यंंत बीजी-१ व बीजी-२ हे दोन वाण बाजारात आणले आहेत, शिवाय बीजी-३ संशोधन  प्रक्रियेत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बीजी-१ व बीजी-२ या दोन्ही वाणांची उत्पादन क्षमता अधिक असली तरी त्यावर कोणतेही  तणनाशक मारता येत नाही. त्यामुळे बीजी-३ हे वाण विकसित करण्यात आले आहे.
यावर तणनाशकाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे मानले जात आहे. त्यामुळेच या वाणाला राऊंड ऑफ रेजिस्टंट (आरआर) या  नावानेही ओळखल्या जाते. अलीकडे शेतकर्‍यांमध्ये या बियाण्याची फार मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे.
परंतु या बियाण्याच्या विक्रीला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. माहिती सूत्रानुसार सध्या बीजी-३ बियाणे संशोधन व मंजुरी प्रक्रियेत आहे.  त्यामुळे ते खरंच शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे की नाही, यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र काही बियाणे विक्रेते जाणीवपूर्वक या  बियाण्याचा प्रचार करून, त्याची चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कृषी विभाग अशा विक्रेत्यांचा कसून शोध घेत  आहे. यातच कृषी विभागाने गत दोन दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील बोधली व पुसद येथून बोगस बीटी बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. कृषी  विभागाने यंदा बोगस बीटी बियाण्यांविरुद्ध केलेली ही सर्वांंत मोठी कारवाई मानली जात आहे.

Web Title: Farmer bogs seeds!