शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब सवलत योजना फसली

By admin | Updated: June 8, 2015 02:27 IST

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी एका प्रवाशाला देण्यात येणाऱ्या या सवलतीत त्या प्रवाशासह कुटुंबातील अन्य तीन प्रवाशांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. या एका कार्डसाठी मोजाव्या लागणाऱ्या शुल्कात ३00 रुपयांनीही वाढ करण्यात आली. मात्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगून ही योजना पुढे सरकवण्यातच आली नसल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.एसटी महामंडळाकडून साध्या बस सेवांसाठी वार्षिक सवलत कार्ड योजना प्रवाशांसाठी सुरू आहे. पूर्वी एका प्रवाशामागे २00 रुपये या कार्डसाठी मोजावे लागत होते. या कार्डमुळे त्या प्रवाशाला प्रवासात १0 टक्के सूट दिली जाते. मात्र या योजनेत एका प्रवाशाबरोबरच त्याच्या कुटुंबातील अन्य तीन जणांना या सवलतीत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बोर्डाच्या गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर त्याची पुढे अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फसल्याचे समोर आले आहे.या योजनेनुसार कुटुंबाला कार्डसाठी २00 रुपयांऐवजी ५00 रुपये मोजावे लागतील आणि प्रवासात १० टक्के सूट मिळणार होती. त्याचबरोबर या कार्डाच्या नूतनीकरणातही बदल करीत पूर्वी २00 रुपये नूतनीकरणास लागत असतानाच पहिल्या नूतनीकरणासाठी १८0 रुपये, दुसऱ्या नूतनीकरणासाठी १६0 तर तिसऱ्या नूतनीकरणासाठी १५0 रुपये लागतील, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना महामंडळाकडून विम्याची रक्कम १ लाख रुपयांवरून दीड लाखापर्यंत वाढवण्यात आली. तर नूतनीकरण करणाऱ्या प्रवाशासाठी २ लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासारखे अनेक फायदे देणारी ही योजना सरकार दरबारी रेंगाळल्याने प्रवाशांना मात्र फटका बसला असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. --------या योजनेत प्रवाशासोबतच त्याच्या कुटुंबातील तीन जणांना सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बोर्डाच्या गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर त्याची पुढे अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फसल्याचे समोर आले आहे.