शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

हार्बरवर कालबाह्य गाड्या

By admin | Updated: April 6, 2015 04:13 IST

रेल्वेचे केवळ दोनच मार्ग, बारा डबा लोकलची प्रतीक्षा, एसी-डीसीला लागणारा विलंब पाहता हार्बरवासीय प्रवासी रेल्वेच्या महत्वाच्या सुविधांपासून अजूनही

मुंबई : रेल्वेचे केवळ दोनच मार्ग, बारा डबा लोकलची प्रतीक्षा, एसी-डीसीला लागणारा विलंब पाहता हार्बरवासीय प्रवासी रेल्वेच्या महत्वाच्या सुविधांपासून अजूनही वंचित राहिलेले आहेत. असे असतानाच हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर अजूनही २५ वर्षे जुन्याच लोकल धावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा २७ लोकल हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वे मार्गावर मेन लाईन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर १२१ लोकल असून त्यांच्या १,६१८ फेऱ्या होतात. यातून दिवसाला ४0 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवाशांच्या दिमतीला बंबार्डियर कपंनीच्या लोकलही लवकरच आणल्या जाणार आहेत. सध्या दोन बंबार्डियर लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक सोयिसुविधांचा वर्षाव होत असताना हार्बरवरील प्रवासी मात्र उपेक्षितच आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एकूण १२१ लोकलपैकी ४६ लोकल या हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर धावतात. या ४६ लोकलमध्ये ३६ हार्बरवर तर १0 ट्रान्स हार्बरवर लोकल धावत आहेत. मात्र या ४६ लोकलधील २७ लोकल या जुन्या असून त्यांचे आयुर्मान संपल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यांना २५ वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २७ गाड्यांध्ये १५ गाड्या डीसी-एसी परावर्तनावर धावणाऱ्या, नऊ गाड्या भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (भेल) आणि तीन गाड्या रेट्रोफिटेड आहेत. २७ लोकल गाड्यांचे आयुर्मान २0११ मध्येच संपले आहे. परंतु त्या २0१६ पर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याचा फटका मात्र प्रवाशांना बसू शकतो. जुन्या लोकलमुळे अपघातांचा धोकाही संभवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)