शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पकनगरला पर्यावरण विभागाचा अडथळा

By admin | Updated: December 27, 2014 04:32 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये विकसित भूखंड देण्यात आले आहेत.

कमलाकर कांबळे , नवी मुंबईआंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये विकसित भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडांची बुधवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. मात्र पुष्पकनगरच्या उभारणीला पर्यावरण विभागाची परवानगी लागणार असल्याने या सोडतीतील भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना पुढच्या डिसेंबर महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर जमीन सिडकोने यापूर्वीच संपादित केली आहे. बारा महुसली गावातील उर्वरित ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित खातेधारकांना २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत झालेल्या तीन सोडतीद्वारे आतापर्यंत ६६७ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. हे सर्व भूखंड नव्याने विकसित होणाऱ्या पुष्पकनगर नोडमध्ये देण्यात आले आहेत. सध्या पुष्पकनगरच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. जमीनचे सपाटीकरण करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. मात्र सेवासुविधा उपलब्ध करण्यासाठी सिडकोला पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सोडतीत लागलेल्या भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी संबंधित खातेधारकांना पुढील डिसेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असले तरी मेट्रो सेंटरकडून निवाडा प्रत प्राप्त होताच भूखंड वाटपाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून भूखंडधारकांबरोबर रीतसर करारपत्र केले जाणार आहे.