शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

एल्गार प्रकरणातील आरोपींकडूनच खटला लांबविण्यासाठी विविध अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 9:10 PM

जप्त करण्यात आलेला डेटा हा अंदाजे २५ टीबी असल्याचे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद

ठळक मुद्देजिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांचा युक्तिवाद 25 ऐवजी 16 जीबी डेटा मिळाल्याची आरोपींची तक्रारआरोपींच्या वकिलांनी दिलेल्या अर्जावर 3 फेब्रुवारी रोजी निकाल होणार

पुणे : एल्गार प्रकरणातील आरोपींकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मधील डेटा किती जीबी आहे, याची अचुक आकडेवारी तपास अधिकारी  नव्हे तर फॉरेन्सिक लॅब्रोटरी (एफएसएल) देवू शकते. आता प्रकरण आता आरोपी निश्चितीपर्यंत पोचले असताना हा खटला लांबविण्यासाठी आरोपी विविध अर्ज करीत आहे. असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी सोमवारी केला. आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या अर्जावर 3 फेब्रुवारी रोजी निकाल होणार आहे. २५ टीबी डेटा जप्त करून आम्हाला केवळ १६ टीबी डेटा देण्यात आला असे आरोपींचे म्हणणे आहे. मात्र नेमका किती जीबी डेटा आहे हे एफएसएलच सांगू शकते. एफएसएलने दिलेल्या सर्व रिपोर्टची कॉपी आरोपींना देण्यात आली आहे, असा युक्तिवाद पवार यांनी केला. तर आरोपींना मूळ मुद्देमालाची हॅश व्हॅल्यू देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला डेटा हा अंदाजे २५ टीबी असल्याचे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे, असे या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी न्यायालयास सांगितले.विश्लेषण बाकी असलेला डेटा अद्याप आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस उर्वरित डेटा खटला सुरू झाल्यानंतर देणार का असा प्रश्न बचाव पक्षांचे वकील शाहीद अख्तर यांनी उपस्थित केला. तर आरोपींना देण्यात आलेली क्लोन कॉपी आमच्या कामाची नाही. कारण ती क्लोन कॉपीची कॉपी करून तयार करण्यात आली आहे. सील केलेला डेटा हा आरोपींच्या ताब्यातूनच जप्त करण्यात आला आहे की नाही याबाबत शंका आहे. ते समजून घेण्यासाठी आम्हाला मूळ डेटाची क्लोन कॉपी हवी आहे, अशी मागणी बचाव पक्षांचे वकील रोहन नहार यांनी केली.  * पोलिसांनी आम्हाला दिलेल्या क्लोन कॉपीची आणि जप्त केलेल्या डेटाची हॅश व्हॅल्यू काढून ती तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेल्या डेटाची क्लोन कॉपी हॅश व्हॅल्यूसह पुरवावी, अशी मागणी करणारा अर्ज एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने पवार यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाCourtन्यायालयPoliceपोलिस