शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून राज्यात ५ ठार!

By admin | Updated: April 11, 2015 02:07 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात वीज कोसळून पाच जणांचा

औरंगाबाद/पुणे/अकोला : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला़ यामध्ये वाशिममध्ये दोघांचा, नांदेड, जालना आणि नगर जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ राज्यभर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे तापमानात मोठी घट नोंदवली गेली.मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेडमध्ये गारपिटीने तडाखा दिला. जालना, हिंगोली, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गोटन गावात आंब्याच्या झाडावर वीज कोसळून रणजीत मरमठ (२२) हा जागीच ठार झाला. तर, चंदन राजीरवाल (२०), उमेश जगताप (२३) हे गंभीर भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नांदेडच्या नायगाव तालुक्यात शेतात कापूस वेचणी करताना सयाबाई किशन लांडगे (५६) ही ठार झाली़ अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसासह गारपीट झाली़ पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे शिवाजी डोमे (४५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला़बुलडाणा आणि वाशिमला पावसाने झोडपले. बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसासह गारपीट आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार, तर अकोल्यात तुरळक पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात वीज कोसळून रामा लोणकर (१६) व विठ्ठल माधव तागड (१७) या दोघांचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा तालुक्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पुण्यात राजगुरूनगर भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. राज्यात सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सिअस तापमान मालेगावमध्ये नोंदविले गेले. त्यापाठोपाठ अकोला, चंद्रपूर, वर्धा या शहरांचेच तापमान ४० अंशांवर होते. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)