शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या इमारतींचे इलेक्ट्रिक आॅडिट बंधनकारक

By admin | Updated: June 3, 2015 03:34 IST

गजबलेल्या काळबादेवीसारख्या विभागातील आगीच्या दुर्घटनेतून धडा घेऊन जुन्या व धोकादायक इमारतींना इलेक्ट्रिक आॅडिट दरवर्षी करून घेणे

मुंबई : गजबलेल्या काळबादेवीसारख्या विभागातील आगीच्या दुर्घटनेतून धडा घेऊन जुन्या व धोकादायक इमारतींना इलेक्ट्रिक आॅडिट दरवर्षी करून घेणे बंधनकारक करण्याची शिफारस पालिकेच्या विशेष चौकशी समितीने केली आहे़ यात कुचराई करणाऱ्या इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचनाही करण्यात आली आहे़पालिकेच्या अहवालानुसार मुंबईतील ५० टक्के जुन्या इमारतींमध्ये आग लागण्यास शॉर्टसर्किट हे प्रमुख कारण असल्याचे उजेडात आले आहे़ दक्षिण मुंबईतील अशा जुन्या इमारती अरुंद व गजबलेल्या भागात असल्याने त्या ठिकाणी मदत यंत्रणा पोहोचण्यासही विलंब होत असतो़ त्यामुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रिक आॅडिट सक्तीचा करण्याचा मार्ग डॉ़ मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविला आहे़ दरवर्षी असे आॅडिट करून घेणे बंधनकारक करण्याची शिफारस या समितीने केली आहे़ दक्षिण मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर, भेंडी बाजार, डोंगरी या भागांमधील जुन्या इमारतींमध्ये लोंबळकणाऱ्या वायरिंग व सदोष मीटर बॉक्समुळे शॉर्टसर्किटचा धोका वाढतो़ यात सुधारणा न करणाऱ्या ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्यांतर्गत वीज कंपन्यांनी कडक कारवाई करू शकतात़ अशा जुन्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अग्निशमन दलाने पर्याय सुचवावेत, अशी सूचना या समितीने केली आहे़ (प्रतिनिधी)