इलेक्शन ड्युटी’चा मोबदला मिळणार

By Admin | Updated: July 23, 2015 02:03 IST2015-07-23T02:03:11+5:302015-07-23T02:03:11+5:30

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा मोबदला देण्याबाबत

Election Duty will get reimbursement | इलेक्शन ड्युटी’चा मोबदला मिळणार

इलेक्शन ड्युटी’चा मोबदला मिळणार

जमीर काझी , मुंबई
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा मोबदला देण्याबाबत गृहविभागाला तब्बल ११ महिन्यानंतर जाग आली आहे. पोलिसांना त्यांचा जादा काम केल्याचा भत्ता देण्यात येणार आहे. सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना ‘इलेक्शन ड्युटी’ केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पोलीस मुख्यालयाला कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील २८८ मतदारसंघांत निवडणुकीच्या काळात विशेष कार्यालय स्थापन करण्यात आले होते. तेथे अन्य विभागांबरोबरच पोलीस दलातील सरासरी दोन अधिकारी व सहा कर्मचारी कार्यरत होते. त्यांना एक महिन्याचे मूळ वेतन मिळणार आहे. ‘इलेक्शन ड्युटी’ बजावलेल्या महसूल व अन्य शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्त्याचे वितरण करण्यात आले होते. मात्र निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या पोलिसांना मात्र त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.
निवडणूक काळात काम केलेल्या राज्यातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी २७ जुलैपर्यत गृहविभागाकडे पाठविणे सर्व विभागीय कार्यालयांना बंधनकारक केले आहे. संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांच्या बँक खात्यावर निवडणूक भत्ता जमा होईल, असे गृह विभागाने सांगितले.

Web Title: Election Duty will get reimbursement