शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणतज्ज्ञ मालवीय

By admin | Updated: December 25, 2014 02:12 IST

एक राजकीय मदनमोहन मालवीय एक शिक्षणतज्ज्ञ होते़ बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक म्हणून ते सर्वपरिचित आहेत़

एक राजकीय मदनमोहन मालवीय एक शिक्षणतज्ज्ञ होते़ बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक म्हणून ते सर्वपरिचित आहेत़ २५ डिसेंबर १८६१ रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला़ त्यांचे वडील पंडित ब्रजनाथ संस्कृतचे विद्वान होते़ मालवीय यांनी कोलकाता विद्यापीठातून बीए पदवी घेतली़ १८८४ मध्ये अलाहाबाद जिल्हा शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी पत्करली़ तत्कालीन परंपरेनुसार, वयाच्या १६व्या वर्षी कुंदन देवी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला़ त्यांना १० अपत्ये झालीत़़ १८९१ मध्ये त्यांनी अलाहाबाद जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली़ १८९३ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी वकिली पत्करली़ त्यानंतर निवृत्ती पत्करत त्यांनी स्वत:ला समाजाला वाहून घेतले़ मात्र याचदरम्यान १७७ स्वातंत्र्यसैनिकांना एका प्रकरणात फाशी ठोठावण्यात आली़ मालवीय यांनी त्यांची वकिली पत्करली आणि आपली योग्यता आणि तर्कांच्या जोरावर १५१ स्वातंत्र्यसैनिकांची निर्दोष सुटका केली़१९१२ साली ते ब्रिटिश कौन्सिलचे सदस्य बनले़ १९२८ साली सायमन चले जावो, आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता़बनारस हिंदू विद्यापीठाच्या रूपाने शिक्षण क्षेत्रात त्यांनी अपूर्व योगदान दिले़ प्राचीन भारतीय परंपरा कायम ठेवत जगभरातील तांत्रिक प्रगतीचेही शिक्षण दिले जाईल, असे विद्यापीठ साकारायचा पण त्यांनी केला आणि तो पूर्णही केला़ १९१६ मध्ये भारतात बनारस हिंदू विद्यापीठ साकारले़ मदनमोहन मालवीय हिंदू महासभेच्या एका प्रभावी नेत्यांपैकी एक होते़ शांतताप्रिय, सरळसाधे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते़ १२ नोव्हेंबर १९४६ रोजी वयाच्या ८५ वर्षी त्यांचे निधन झाले़