शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस खाणे मूलभूत अधिकार नाही

By admin | Updated: April 22, 2015 04:14 IST

गोमांस खाणे किंवा बाळगणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असू शकत नाही, असा दावा राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात केला़

मुंबई : गोमांस खाणे किंवा बाळगणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असू शकत नाही, असा दावा राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात केला़
गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर गोमांस बाळगणे व खाणे यावरही सरकारने बंदी घातली़ याविरोधात डझनभर याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत़ ही बंदी म्हणजे राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार महाराष्ट्र सरकार हिरावून घेत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे़ तसेच राज्याबाहेरून गोमांस आणण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे़ याचे प्रत्युत्तर सादर करताना अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी हा दावा केला़ मुळात वन्य पशुसंवर्धन व संरक्षण या कायद्यांतर्गत गोवंश हत्या बंदी करण्यात आली आहे़ आणि वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत हरीण व इतर काही प्राण्यांच्या हत्येस बंदीच आहे़ या प्राण्यांच्या यादीत गोवंशचा समावेश करण्यात आला आहे़ कारण गोवंश हा शेतीसाठी उपयुक्त आहे़
काहीही खाण्याचा नागरिकांना अधिकार असला तरी गोमांस खाणे हा मूलभूत अधिकार असू शकत नाही़ वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकार गोवंश हत्या बंदी लागू करू शकते़ महत्त्वाचे म्हणजे ही बंदी कायद्याच्या चौकटीतच राहून केली आहे, असा युक्तिवाद अ‍ॅडव्होकेट जनरल मनोहर यांनी न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर केला़ यावर उद्या बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे़ या बंदीचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्रही शासनाने सोमवारी न्यायालयात दाखल केले़ पशुसंवर्धन व संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे़ कितीही अत्याधुनिक यंत्रे आली तरी या प्राण्यांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे़ गाईपासून मिळणाऱ्या दुधासारखे दुसरे पौष्टिक अन्न नाही़ या प्राण्यांपाासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे सरकारचे वित्तही वाढते़ त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यकच असल्याने राज्यात गोवंश हत्या बंदी
लागू करण्यात आली आहे, असा दावा
या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)