शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

दौंडचा पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 10, 2016 01:16 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैर्ऋत्य मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैर्ऋत्य मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. उजनी धरणाचे बॅक वॉटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदान आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. परंतु, गेल्या ४२ वर्षांत राजेगावमध्ये कधीही न आटणारी भीमा नदीचे पात्र यंदा प्रथमच कोरडे पडले आहे. परिणामी, या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची तगमग होत असल्याने या भागातील शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शनिवार (दि. ४) या परिसरात थोडाफार बिगरमोसमी पाऊस पडला. परंतु, या पावसामुळे शेतीला फारसा काही दिलासा मिळाला नाही. या परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. परंतु, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांना पाणी आणि चारा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुष्काळामुळे पोटच्या पोरासारखं जीवापाड सांभाळलेले पशुधन मातीमोल किंमतीत विकण्याची दुर्देवी वेळ बळीराजाच्या नशिबी आली आहे. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले, की पाऊस पडल्यानंतर या परिसरातील कोरडवाहू शेतीत बाजरीचे पीक घेतले जाते. परंतु, गेली तीन-चार वर्षे मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने या परिसरातील शेतकऱ्याला बाजरी पीक घेता आले नाही. यंदातरी मान्सून वेळेवर येईल आणि बाजरीची लागवड करता येईल, या आशेवर या भागातील शेतकरी आहे. सात दिवसांच्या विलंबाने का होईना, नैर्ऋत्य मान्सून केरळला पोहचला असून मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाल्याने शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा परिसर ऊस पिकाचे आगार मानला जातो. पाऊस पडल्यानंतर १ जुलैपासून या परिसरात प्रत्येक साखर कारखान्यांच्या धोरणानुसार आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, यंदा भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने कृषीपंप गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. शिवाय विहीरी आणि कुपनलिका हे पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. राजेगाव येथील शेतकरी गणेश मोरे आणि दीपक धापटे म्हणाले, की सध्या दुष्काळाने पाण्याचे सर्व जलस्रोत आटले आहेत. जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वरुणराजाने दिलासा दिला नाही तर शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.