शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांनाही मिळणार रेल्वेचे ई-तिकीट

By admin | Updated: July 18, 2014 01:12 IST

अपंग व्यक्तीसुद्धा आता रेल्वेचे आॅनलाईन तिकीट (ई-तिकीट) स्वत: घेऊ शकतील. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. दिल्लीमध्ये या सॉफ्टवेअरची

विशेष सॉफ्टवेअर विकसित : आयआरसीटीसीचा पुढाकार
आनंद शर्मा - नागपूर
अपंग व्यक्तीसुद्धा आता रेल्वेचे आॅनलाईन तिकीट (ई-तिकीट) स्वत: घेऊ शकतील. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. दिल्लीमध्ये या सॉफ्टवेअरची तपासणी केली जात आहे. येत्या १५ दिवसात हे सॉफ्टवेअर भारतीय रेल्वेच्या हवाली केले जाईल. त्यानंतर रेल्वेतर्फे अपंग प्रवाशांना ई-तिकिटांची सुविधा उपलब्ध केली जाईल.
अपंग रेल्वे प्रवाशांसाठी सध्या आरक्षण कार्यालयात विशेष काऊंटर तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये विशेष बोगीसुद्धा जोडण्यात आलेली आहे. परंतु ई-तिकिटांबाबत मात्र भेदभाव केला जात होता. ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य प्रवाशांना ई-तिकिट उपलब्ध करून दिले जाते. परंतु अपंग प्रवाशांना मात्र ही सुविधा अजूनपर्यंत मिळालेली नाही.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अपंग व्यक्तींना ई-तिकीट जारी करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अपंगांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अपंग आणि अंध प्रवाशांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी त्यांना अपंगांसंबंधीचे प्रमाणपत्र आरक्षण काऊंटरवर कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यास दाखवावे लागते. माहितीनुसार अपंगांचे प्रमाणपत्र आता नवीन ‘फॉर्मेट’नुसार सादर करावे लागते. त्यानंतरच त्यांना सवलतीचा लाभ घेता येतो. यासाठी अपंगांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश वेळा अपंगांचे आरक्षण तिकीट घेण्यासाठी त्यांचे नातलगच आरक्षण कार्यालयात येतात. त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.