शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचेच वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 4:04 AM

‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा करणाऱ्या भाजपपासून सर्वच पक्षांमध्ये सारखी स्थिती

कोल्हापूर : संयुक्तमहाराष्ट्राची स्थापना होऊन आज ५९ वर्षे लोटली असली तरी या सहा दशकांच्या कालावधीत राज्याचे राजकारण काही ठरावीक घराण्यांच्याच केंद्रस्थानी राहिले आहे. खरेतर, प्रवरानगरच्या विखे-पाटील घराण्यापासूनच राज्यातील राजकीय घराणेशाहीचा आरंभ झाला असे मानले जाते. मात्र, आजघडीला महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो, राज्याचे राजकारण पवार, मुंडे, विखे, चव्हाण या नावांच्या पलीकडे कधी गेलेच नाही.एकाने खुर्ची खाली केली की लगेच त्याच खुर्चीवर वारसाहक्क सांगितला जाऊ लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला ५९ वर्षांच्या कार्यकाळात नवे चेहरे मिळू शकले नाहीत. अर्थात, याला आर. आर. पाटील यांच्यासारखे काही अपवाद ठरले असले तरी घराणेशाहीची झूल आम्ही पांघरत नाही म्हणणारी शिवसेना असो की पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणारी भाजप असो, या सर्वच पक्षांनी पुढे जाऊन आपापल्या पक्षात घराणेशाही नकळतपणे रुजवली. त्यामुळे राज्याच्या स्थापनेपासूनचे पहिले दशक सोडल्यास या घराणेशाहीच्या छटा राजकारणात स्पष्टपणे उमटल्यात.- बाळासाहेब विखे-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील- वसंतदादा पाटील, प्रकाश पाटील, प्रतीक पाटील- वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक- शरद पवार, अजित पवार, रोहित पवार- बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे- गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे- बाळासाहेब देसाई, शंभूराजे देसाई- अभयसिंहराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले- राजारामबापू पाटील, जयंत पाटील- केशरकाकू क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर- शंकरराव मोहिते-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील- शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, अमिता चव्हाण- विलासराव देशमुख, अमित देशमुख- छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ- नारायण राणे, नीतेश राणे- भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात- प्रेमलाताई चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण- कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, राहुल आवाडे- तात्यासाहेब कोरे, विनय कोरे- मुरली देवरा, मिलिंद देवरा- सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे- एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड- दत्ता पाटील, जयंत पाटील- पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील- शंकरराव पाटील, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील- दत्ता मेघे, सागर मेघे- दत्तात्रय वळसे-पाटील, दिलीप वळसे-पाटील- सुभाष कुल, रंजना कुल, राहुल कुल- वसंत डावखरे, निरंजन डावखरे- सुनील तटकरे, अनिकेत तटकरे- विजयकुमार गावित, हिना गावित- रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर- पुंडलिक गवळी, भावना गवळी

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019