महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 10:37 AM2020-02-04T10:37:47+5:302020-02-04T10:42:43+5:30

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे.

Dushyant Chaturvedi wins in Yavatmal Legislative Council elections | महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

googlenewsNext

यवतमाळ - विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपाचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी रोजी 100 टक्के मतदान झाले होते.  

यवतमाळ विधानपरिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या पसंतीची 298 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना 185 मते मिळाली. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली होती. 


या निवडणुकीपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने मतदारांना सहलीही घडविण्यात आल्या होत्या. तसेच महाविकास आघाडीने आपल्या मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली होती. तसेच अवैध मतदान टाळण्याच्या दृष्टीने गुरुवारी नागपुरात मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकही महाविकास आघाडीने करून घेतले होते.  

Web Title: Dushyant Chaturvedi wins in Yavatmal Legislative Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.