शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्यावरून सरकारला ‘छडी’!

By admin | Updated: September 24, 2015 01:23 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात समितीने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शाळांना द्या

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात समितीने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शाळांना द्या, असे म्हणत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला परिपत्रक काढण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या मानाने २० ते ३० टक्के अधिक असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका स्वाती पाटील यांनी दाखल केली. त्यावर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.खंडपीठाने समितीच्या शिफारशींवर व यासंदर्भातील सरकारच्या निर्णयावर केव्हा अंमलबजावणी करणार, अशी विचारणा सरकारी वकील अंजली हेळेकर यांच्याकडे केली. त्यावर अ‍ॅड. हेळेकर यांनी राज्यात १,०६,४९५ शाळा असल्याने शिफारशींवर अंमलबजावणी करण्यासाठी काही काळ लागेल, असे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला यासंदर्भातील परिपत्रक काढण्यासाठी राज्य सरकारला चार आठवड्यांची मुदत देत परिपत्रक स्पष्ट शब्दांत असेल, असेही बजावले. विद्यार्थी ठरावीक वजनाचेच दप्तर शाळेत आणतील, अशी सूचना परिपत्रकाद्वारे द्या. तसेच शिफारशींवर अंमलबजावणी नाही केली तर कोणाला जबाबदार धरण्यात येईल याचाही उल्लेख करा. शाळांना लॉकरची सुविधा देण्याचे आणि शिफारशींवर अंमलबजावणी करून त्यानुसार वेळापत्रक आखण्याचेही आदेश द्या.(प्रतिनिधी)