शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यासाठी ढोल-ताशाचा गजर

By admin | Updated: August 5, 2016 00:41 IST

कायमस्वरूपी अभियंता देत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका कार्यालयात ढोल-ताशा वाजवून आंदोलन करण्यात आले.

पुणे : कायमस्वरूपी अभियंता देत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका कार्यालयात ढोल-ताशा वाजवून आंदोलन करण्यात आले. आयुक्त कुणाल कुमार यांनी त्याची दखल घेत शिष्टमंडळाला बदली केलेले अभियंता हजर झाले नाहीत तर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.धायरी येथील मनसेचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे व युगंधरा चाकणकर यांनी सतत मागणी करूनही आमच्या प्रभागाला पालिका प्रशासन कनिष्ठ अभियंता देत नसल्याचे सांगितले. एका महिन्यात तीन अभियंते आले व ते रुजू होताच लगेचच त्यांची बदली करण्यात आली. प्रशासन विभागाचा कार्यभार असलेले मंगेश जोशी यांच्यामुळेच अभियंत्यांची सतत बदली होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे, नगरसेविका सुशीला नेटके, पुणे शहर सचिव महेश महाले व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आयुक्त कुमार यांच्या दालनात नंतर या सर्वांनी ठिय्या दिला. आयुक्तांनी तुमच्या प्रभागात अभियंत्याची नियुक्ती केली असल्याचे त्यांना सांगितले. लायगुडे यांनी बदली झालेले अभियंते हजरच होत नाहीत, हजर झाले की लगेचच त्याची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात येते असे आयुक्तांना सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर विकासकामांवर मर्यादा येईल. त्यापूर्वीच कामांची अंदाजपत्रके तयार करणे, कार्यारंभ आदेश देणे ही कामे होणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी केला.