शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

पानसरे व त्यांच्या पत्नीवरील हल्लाप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी गारगोटीतील संशयित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवरील हल्लाप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी गारगोटीतील संशयित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शी १२वर्षीय मुलाने दिलेल्या माहितीवरून हल्लेखोरांचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले आहे. पानसरे दाम्पत्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या शोधासाठी मुंबई क्राइम ब्रँच, दहशतवादविरोधी पथक अशी सुमारे २० विशेष पथके रात्रंदिवस काम करीत आहेत. पानसरे दाम्पत्य नाष्टा करण्यासाठी जाताना दोघा तरुणांनी उमा पानसरे यांना ‘पानसरे कुठे राहतात?’ अशी विचारणा केली. या वेळी एक-दोन मिनिटे त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर नाष्टा करून परत येत असताना पत्ता विचारणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. या तरुणांनी मराठीतच पत्ता विचारल्याचे सूत्रांकडून समजते. तपासामधील काही महत्त्वाच्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी गारगोटीच्या तरुणाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. मारेकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या शाळकरी मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी त्यांची चार-पाच रेखाचित्रे बनविली आहेत. ती पानसरे दाम्पत्यास दाखविण्यासाठी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा रुग्णालयात गेले होते. या वेळी त्यांनी जखमी उमा पानसरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्यांचा जबाब आणि मारेकऱ्यांचे रेखाचित्र त्यांना दाखविणे आवश्यक आहे. त्या दोघांनी या रेखाचित्रांना संमती दिल्यानंतरच ती पोलिसांकडून प्रसिद्धीस दिली जाणार आहेत. च्पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याचा तपास करीत असताना शहरात महत्त्वाच्या ठिकाणी तीन मोटारसायकली बेवारस स्थितीत मिळाल्या आहेत.च्हल्लेखोरांनी काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. च्पोलिसांना सापडलेल्या मोटारसायकलींमध्ये एक पल्सरही आहे, परंतु तीच मोटारसायकल हल्लेखोरांची आहे का, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. गाडीवरील चेसीस नंबर तपासून त्या गाडीच्या मालकापर्यंत पोहोचण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. मोबाइल कॉल्सची छाननीपानसरे खुनी हल्ल्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक पद्धत अवलंबली आहे. पानसरे यांच्या निवासस्थान परिसरातील सर्व कंपन्यांच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन तपासले जात आहे. हल्ल्यापूर्वी व नंतर कोणाकोणाचे कॉल्स आले-गेले याची माहिती पोलीस घेत आहेत. मोबाइल टॉवरचे लोकेशन पाहण्यासाठी मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक मुख्यालयातील सायबर सेलमध्ये बसून आहे.