शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सलीम अली उद्यानावर राज्य शासनाचा कब्जा

By admin | Updated: April 29, 2016 04:20 IST

ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे.

ठाणे : ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे शासनाचा पैसा लाटण्यासाठी सीआरझेड तीनवर पालिकेने हे उद्यान थाटल्याची माहिती समोर आली आहे. परंतु,याच मुद्यावरुन सोमवारी महासभेत विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा ताबा घेतल्याची माहितीच प्रशासनाला नसल्याची बाबही या निमित्ताने समोर आली.
कळव्याला जाताना, खाडीकिनारी हे उद्यान उभारले आहे. सुरवातीला पालिका येथे कचरा टाकत होती. त्यानंतर ही जागा उद्यानात रुपातंरीत करण्यात आली. १४ हेक्टर जागेवर हे उद्यान वसले असून सुरवातीला ऋतुचक्र असे नाव या उद्यानाला दिले होते. परंतु,नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाला डॉ. सलीम अली उद्यान हे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील नाव या उद्यानासाठी निश्चित झाले. परंतु, सीआरझेड तीन बाधीत असलेल्या या जागेवर पालिकेने उद्यान विकसित करुन सुरुवातीला खारफुटीची लागवड केली होती. तसेच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्चही केला. काही वर्षांपूर्वी येथे वृक्ष लागवड व हिरवळीसाठीही लाखोंचा प्रस्ताव पालिकेत वादग्रस्त ठरला होता. ही जागा सीआरझेडने बाधीत असतांना त्यावर एवढा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित करुन याला विरोध झाला होता. परंतु विरोध डावलून पालिकेने हा प्रस्ताव मंजूर केला होता. दरम्यान आजही या उद्यानाचे लोकार्पण झालेले नाही. तसेच, सध्या आतील भागात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. सोमवारीच्या महासभेत एका विषयाच्या अनुषंगाने नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाच्या मुद्याला हात घालून प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले. डॉ. सलीम अली उद्यान शासनाने ताब्यात घेतले आहे, का? असा सवाल त्यांनी केला. तशा स्वरुपाचे फलक उद्यानाच्या ठिकाणी लावल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु याची कल्पना नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने सुरुवातीला दिली.