शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

चिंता नसावी! राज्यातील धरणे ७० टक्के भरलेली, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 07:39 IST

कोकणातील ११ धरणात ६४ टक्के साठा आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये ६० टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ६१ टक्के होता.

बाळासाहेब बोचरे

मुंबई: फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्हे नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांश धरणांमध्ये ७० टक्केच्यावर साठा असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठी २० टक्के जास्त आहे. 

राज्यात १३८ मोठी धरणे आहेत. त्यामध्ये सरासरी ६९.४० टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त जलसाठा आहे. सर्वाधिक ७६ टक्के जलसाठा नाशिक विभागातील २२ धरणांमध्ये आहे.  त्याखालोखाल संभाजीनगर विभागातील ४४ धरणांमध्ये ७३.२० टक्के साठा आहे. अमरावती विभागातील १० धरणात ६९ टक्के तर पुणे विभागातील ३५ धरणात ७० टक्के साठा आहे. कोकणातील ११ धरणात ६४ टक्के साठा आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये ६० टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ६१ टक्के होता.

२६० मध्यम प्रकल्प ६५ टक्के भरलेलेराज्यात २६० मध्यम प्रकल्पात सरासरी ६५% जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ११% अधिक आहे. कोकणातील ८ प्रकल्पात ८३%,  अमरावतीतील ३५ प्रकल्पात ७२%,  पुणे विभागातील ५० प्रकल्पात ६६%,  नाशिक विभागातील ५४ प्रकल्पात ६३%, छत्रपती संभाजीनगर विभागातील ८१ प्रकल्पात ५७ %  जलसाठा आहे. 

२५९९ लघू प्रकल्पात ४९ टक्के जलसाठाराज्यातील २५९९ लघू प्रकल्पात ४८.७४ टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ७ टक्के अधिक आहे. यामध्ये कोकण विभागात सर्वाधिक ७० टक्के तर अमरावती विभागात ६० टक्के साठा आहे. संभाजीनगर आणि नाशिक विभागात ४० टक्के तर पुणे विभागात ४८ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Damधरण