शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत मनसेचे खड्डे बुजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 05:34 IST

रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी डोंबिवलीत अनोखे आंदोलन छेडले.

कल्याण : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी डोंबिवलीत अनोखे आंदोलन छेडले. प्रतीकात्मक गणपती बाप्पाद्वारे खड्डे बुजवण्याबरोबरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बामच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. केडीएमसी हद्दीत पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आंदोलन छेडले होते. यानंतर महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या मनसेने डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेविका सरोज भोईर, परिवहन समितीचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. फडके रोडजवळील मनसेच्या डोंबिवली शहर कार्यालय परिसरातून निघालेला मोर्चा महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर धडकला. तेथे प्रतीकात्मक गणपतीद्वारे खड्डे बुजवण्यात आले. या वेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरतीही म्हटली. या वेळी मनसेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट घेतली. शहरात जागोजागी खड्डे पडले असून, नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. खड्ड्यांमुळे नाहक बळी जाऊनही प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. खड्ड्यांमुळे मानेचे विकार, पाठदुखीचा आजार बळावला आहे. रस्ते सुस्थितीत आणता येत नसतील तर नागरिकांना बामच्या बाटल्या तरी वाटा, असे सुनावत शिष्टमंडळाने बामच्या बाटल्या पाटील यांना भेट दिल्या. (प्रतिनिधी)>मनसेचे वरातीमागून घोडेराष्ट्रवादीने शहरातील खड्ड्यांच्या समस्येवर नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवली होती, तर कल्याणमध्ये चक्कीनाका येथे काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले होते. यात गणेशोत्सव सुरू व्हायला जेमतेम १० ते १२ दिवस शिल्लक असताना मंगळवारी मनसेने छेडलेले आंदोलन म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. मागील महिन्यात खड्ड्यांचे प्रदर्शन भरवून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न मनसेने प्रथम केला. त्यामुळे वरातीमागून घोडे म्हणणे चुकीचे असल्याचे मनोज घरत म्हणाले. रात्रीही बुजवणार खड्डे : मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिका हद्दीतील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता रात्रीही खड्डे बुजवण्याचे काम केले जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेविरहित असतील, असेही ते म्हणाले.