शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनमध्ये खडाजंगी

By admin | Updated: June 29, 2016 03:11 IST

कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होत नसतील व त्यामुुळे जिल्हयाच्या विकासाला खिळ बसत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांची गरजच काय?


पालघर : पालघर जिल्हा निर्मितीच्या दोन वर्षानंतरही सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होत नसतील व त्यामुुळे जिल्हयाच्या विकासाला खिळ बसत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून आपले पालकमंत्री फक्त आश्वासनावर आश्वासने देत असतील तर पालघरच्या विकासाचे देवच भले करो असे उद्गार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत काढले. व आपल्या सहकाऱ्यांसह सभात्याग केला.
पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये दहा तास चालली. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आनंद ठाकूर, अमीत घोडा, पास्कल धनारे, रामनाथ मोते, रविंद्र पाठक, विलास तरे, शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर, पालक सचिव मुकेश खुल्लर आयुक्त सतिश लोखंडे, मिलींद गवारे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलिस अधिक्षक शारदा राऊत इ. सह विविध विभागचे अधिकारी उपस्थित होते.
या वित्त वर्षाच्या ंंंंंंंंंंंंंसर्वसाधारण ११३.९४ कोटी च्या प्रारूप आराखडयाला बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
तसेच २०१५-१६ च्या जिल्हावार्षिक योजना (सर्वसाधारण आदिवासी उपायोजना व विशेष घटक योजनांतर्गत मार्च २०१६ अखेरच्या खर्चास यावेळी मान्यताही देण्यात आली) तसेच गत वर्षी झालेल्या विकास कामांचा आढावाही यावेळी देण्यात आला. २०१५-१६ या वर्षात जिल्हावार्षीक योजना सर्वसाधारण ११२.५१ कोटी आदिवासी उपायोजना ४१५.३५ कोटी पैकी ४०५.२४ कोटी तर विशेष घटक योजना १३.९ कोटी पैकी ८.४६ कोटी खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली.
बैठकीच्या प्रारंभीच मागील सभेचे इतिवृत्त मंजुर करण्यात आले. मात्र त्यावरील अनुपालन अहवालावर बैठकीमध्ये अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. हा विषय तब्बल सहा तास चर्चिला गेला. या दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डी.एन. रावखंडे व पाटबंधारे विभागाचे जिल्हापातळीवरचे अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आ. हितेंद्र ठाकूरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
>खासदार कपील पाटील यांच्या दांडीची चर्चा
ठाणे जिल्हयातुन पालघर जिल्हयात येण्यास जिल्हापरिषद कर्मचारी नाखुश असून खासदार कपील पाटील यांनी राजकीय वजन वापरल्याने ठाणे जिल्हयातील कर्मचाऱ्यांना बळ मिळत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये जि.प. कर्मचाऱ्यांच्या प्रश्न चर्चेत आल्यांनतर आपली कोंडी होईल या भीतीने खा. पाटील यांनी दांडी मारल्याची चर्चा होती.आ. हितेंद्र ठाकूरानी सभेमध्ये पालक सचिव मुकेश खुल्लर यांच्या कामकाजाची स्तुती केली. जिल्हाधिकारी बांगर हे देखील एक चांगले व्यक्तीमत्व असून त्यांचा दृष्टीकोनही जिल्हयाच्या विकासाबाबत सकारात्मक असल्याची प्रशंसा सचीव खुल्लर यांनी केली.
>पालकमंत्र्यांनीच दिली कबुली
क्रीडा खात्यावर झालेला खर्च, नववीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश, वनविभागामार्फत झालेला खर्च, जिल्हापरिषदेच्या कर्मचााऱ्यांच्या समायोजन , इ. अनेक प्रश्न चर्चेला आले. ंंंंंंंंंंं यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा नवीन असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ंंंंंंंंं विकास कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची कबुली दिली. मात्र जिल्हयात आवश्यक अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असुन हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर आ. ठाकुरांनी सभा त्याग करून ते निघून गेले.