शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षण विभागाला टाळे ?

By admin | Updated: April 23, 2015 05:35 IST

स्थायी समितीच्या आखत्यारीत असलेल्या मुख्य लेखापरीक्षण विभागाला टाळे लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे़ या खात्यातील कर्मचारी वर्गात कपात करण्यात येत आहे़

मुंबई : स्थायी समितीच्या आखत्यारीत असलेल्या मुख्य लेखापरीक्षण विभागाला टाळे लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे़ या खात्यातील कर्मचारी वर्गात कपात करण्यात येत आहे़ हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा स्थायी समितीच्या अधिकारावर गदा असल्याचे तीव्र पडसाद आज उमटले़ याची गंभीर दखल घेऊन अन्य विभागांमध्ये पाठविण्यात आलेले लेखापरीक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ माघारी बोलावण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले़ तसेच प्रशासनाच्या मनमानीविरोधात स्थायी समितीची बैठक एकमताने तहकूब करण्यात आली़ मुख्य लेखापरीक्षण हा विभाग १९३८ पासून कार्यरत आहे़ प्रशासकीय कामकाजाचे प्रत्येक महिन्यात परीक्षण करून स्थायी समितीपुढे अहवाल सादर करण्याचे या विभागाचे काम आहे़ परंतु गेल्या सात वर्षांमध्ये या विभागाकडून लेखापरीक्षण अहवाल सादर झालेला नाही़ हजार कर्मचारी-अधिकारी वर्ग असलेल्या या विभागातील शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान खात्यात पाठविण्यात आले आहे़ तसेच या विभागातील मनुष्यबळ कमी करीत हा विभाग बंद करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली असल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले़याबाबत नगर विकास खात्याला पत्र लिहून हा विभाग बंद करायचा असल्याने कर्मचारी वर्गाचे काय करावे, असे पत्रच आयुक्त सीताराम कुंटे यांनी नगर विकास खात्याला पाठविले आहे़ हे पत्र म्हणजे स्थायी समितीच्या अधिकारावर गदाच असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला़ आयएएस लॉबी लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणत असल्याने त्यांना दणका द्यायलाच हवा, असे मत सर्वांनी व्यक्त केले़ स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हे पत्रच बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करीत सभा तहकूब केली़ (प्रतिनिधी)