शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

डिजिटल सातबाऱ्याचे काम ९२ टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 6:19 PM

सातबारा उताऱ्यांतील त्रुटी राहिल्यास ऑनलाईन अर्ज करा...

ठळक मुद्देउर्वरित सात-बारा उताऱ्यातील त्रुटी दूर कराराज्यात २ कोटी ८२ लाख ९२  हजार सात-बारा उतारा२ कोटी १० लाख ४० हजार १४२ सात-बारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरीसातबारा उताऱ्यांतील त्रुटी राहिल्यास ऑनलाईन अर्ज करा 

पुणे : राज्यातील सातबारा उताऱ्यांपैकी ९२ टक्के उतारे डिजिटल झाले असून, ७१ लाखांहून अधिक सात-बारा उतारे डिजिटाईज होणे बाकी आहेत. या उताऱ्यांमधील त्रूटी दूर करु हे काम पूर्ण करण्याचे आदेश तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली. राज्यात २ कोटी ८२ लाख ९२  हजार सात-बारा उतारा असून, त्यापैकी २ कोटी १० लाख ४० हजार १४२ सात-बारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. हे सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. म्हणजेच सुमारे ९२ टक्के सातबारा डिजिटल झाले आहेत. उरलेल्या आठ टक्के उताऱ्यांमधे काही ना काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांना जमीन महसूल कायदा कलम १५५ अन्वये आदेश दिले आहेत. तसेच सातबारा उताऱ्यामधील त्रुटी योग्य प्रकारे दूर होत आहेत की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर सोपविली आहे. तसेच संबधित अधिकारी हे काम सुरळीतपणे करीत नसल्यास, अथवा त्यामध्ये चालढकल होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहे.  सातबारा उताऱ्यातील त्रुटी येत्या दोन महिन्यात दूर करण्याबाबत नुकतेच राज्याचे अवर सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले आहेत. याबाबत मागील काही दिवसांपूर्वी श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्सरन्सद्वारे महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्रुटी राहिलेल्या सातबारा उताऱ्यांवर चर्चा केली होती. त्या नंतरच तहसिलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. --सातबारा उताऱ्यांतील त्रुटी राहिल्यास ऑनलाईन अर्ज करा संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमधे त्रुटी असल्यास खातेदारांना ही त्रुटी दूर करण्यासाठी ई-हक्क प्रणाली द्वारे नलाईन अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती ई-महाभूमी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.  

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलFarmerशेतकरीGovernmentसरकार