शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दिवसभरात २,४८७ रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:52 IST

राज्यात सध्या ३ हजार १५७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १८ हजार ४९० पथकांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात रविवारी २ हजार ४८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ८९ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २ हजार २८६ झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार ३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून १ हजार २४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २९ हजार ३२९ आहे. एकट्या मुंबईत दिवसभरात १ हजार २४४ रुग्णांची नोंद झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या ३९,६८६, तर बळींचा आकडा १२७९ वर पोहोचला आहे.


राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.७ दिवस होता, आता १७.५ झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्याचा मृत्यूदर ३.३७ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे ४३.३५ टक्के आहे. राज्यात रविवारी नोंद झालेल्या ८९ मृत्यूंमध्ये मुंबईतील ५२, नवी मुंबई ९, ठाणे ५, कल्याण-डोंबिवली ४, मालेगाव ६, पुणे ९, सोलापूर २, उस्मानाबाद १ आणि यवतमाळ १ या रुग्णांचा समावेश आहे. या ८९ मृत्यूंमध्ये ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. ५६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून त्यात ३४ हजार ४८० लोक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यात सध्या ३ हजार १५७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १८ हजार ४९० पथकांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.ले आहे.

रशिया, भारतात नवे रुग्ण अधिक
२४ तासांत जगात कोरोनाचे जे ५० हजारांवर रुग्ण आढळले, त्यात रशिया (९३६३) व भारत (८ हजार) या दोन देशांतील १७ हजारांहून अधिक आहेत. त्या खालोखाल ब्राझील (३५४५) व पाकिस्तान (३०३९) यांचा क्रमांक आहे. जगातील रुग्णांची संख्या आता ६२ लाखांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा ३ लाख ७२ हजारांवर गेला आहे. बरे झालेल्यांची संख्या २७ लाख ६३ हजार झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस