शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:19 IST

गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे

बालाजी आडसूळलोकमत न्यूज नेटवर्क कळंब (जि. धाराशिव): विद्यार्थी, गुरुजन, गावकरी यांचे केवळ ‘शिक्षण’ हेच एक ध्येय अन् त्या व्यवस्थेला बळ देणं हीच आत्मीयता असेल, तर ‘निकाल’ नक्कीच यशदायी निघतो. याचाच प्रत्यय गौर जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत दिसून येत आहे. येथे आजूबाजूच्या गाव-शेत वस्त्यांतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘पायपीट’ थांबविण्यासाठी ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बहुतांश कष्टकरी कुटुंबातील असून, ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार न करता दररोज किमान २ ते ३ किलोमीटर अंतराची पायपीट करीत गौर गावातील शाळा गाठतात. 

गरजू मुलांना केले वितरण विद्यार्थ्यांची पायपीट लक्षात घेऊन शिक्षकांनी पुढाकार घेत मुलांना लोकवर्गणीतून सायकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीला सोबत घेत बैठका घेऊन निधी संकलन करून ४० सायकली खरेदी केल्या.त्यांचे वितरणही जि. प.चे सीईओ मैनाक घोष व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. सायकल बँकेची संकल्पना मांडताच बोटावर मोजण्याइतपत दिवसात तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. 

अशी चालणार बँक...शाळेमध्ये बाहेर गावांवरून येणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी एक सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या सायकलला नंबरिंग असेल. तसेच ती शाळेची मालमत्ता राहणार आहे. सायकल स्टॅण्डची उभारणी. दिवाळी, उन्हाळी सुट्टीत सायकल शाळेतील स्टॅण्डला जमा करणे बंधनकारक. इयत्ता पाचवीमध्ये नव्याने दाखल होताच सायकल  विद्यार्थ्याच्या हाती पडणार. सातवी होताच शाळेतून मिळालेली सायकल पुन्हा जमा करावी लागणार आहे. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाMaharashtraमहाराष्ट्रdharashivधाराशिव