अजितदादांचा 'अधुरा' अर्थसंकल्प मी पूर्ण करणार; त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू, मुख्यमंत्र्यांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 21:02 IST2026-01-30T21:00:28+5:302026-01-30T21:02:40+5:30

Ajit Pawar successor news : "अजितदादांची अर्थसंकल्पाची तयारी मी पूर्ण करणार!" देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

Devendra Fadnavis NCP support: I will complete Ajit Pawar's 'incomplete' budget; I will stand with full force behind his family, says the Chief Minister Devendra Fadanvis | अजितदादांचा 'अधुरा' अर्थसंकल्प मी पूर्ण करणार; त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू, मुख्यमंत्र्यांचा शब्द

अजितदादांचा 'अधुरा' अर्थसंकल्प मी पूर्ण करणार; त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू, मुख्यमंत्र्यांचा शब्द

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी महायुतीने हालचालींना वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले की, अजितदादांनी आगामी अर्थसंकल्प २०२६-२७ ची मोठी तयारी केली होती, तो आता मी स्वतः पूर्ण करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, त्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी जाहीर केले.

अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते होते. त्यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर फडणवीस म्हणाले की, "अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी खूप मोठी तयारी केली होती. त्यांचे नियोजन पूर्ण करण्यासाठी उद्यापासून मी स्वतः या कामात लक्ष घालणार आहे. पक्षात किंवा कुटुंबात जो काही निर्णय होईल, त्याला आमचे समर्थन असेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनदा माझी भेट घेतली असून, पुढील दिशा आम्ही एकत्रितपणे बसून ठरवू."

कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

उद्या शपथविधीची शक्यता?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. त्यांचा होकार आला आहे. उद्या (३१ जानेवारी) राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर सायंकाळी ५ नंतर सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. 

Web Title : मुख्यमंत्री अजित दादा का अधूरा बजट पूरा करेंगे, परिवार का समर्थन।

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, मुख्यमंत्री फडणवीस ने 2026-27 के उनके अधूरे बजट को पूरा करने का वादा किया। भाजपा एनसीपी के नेतृत्व के फैसलों का समर्थन करेगी। सुनेत्रा पवार उप मुख्यमंत्री पद की शपथ ले सकती हैं।

Web Title : CM to complete Ajit Dada's budget, support his family.

Web Summary : Following Ajit Pawar's death, CM Fadnavis pledges to complete his unfinished budget for 2026-27. BJP will support NCP's leadership decisions. Sunetra Pawar may take oath as Deputy CM after NCP meeting.