शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

'दबंग' शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती

By admin | Updated: October 7, 2016 12:49 IST

आपल्या दबंग कारवाईमुळे प्रसिद्धी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7- आपल्या दबंग कारवाईमुळे प्रसिद्धी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती करण्यात येणार आहे. बिहारमधील स्पेशल फोर्स टास्कमध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या लांडे यांनी काही महिन्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात येण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेत, गृहविभागाला प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतर गृह मंत्रालयाने लांडे यांच्या महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता तीन वर्षांसाठी शिवदीप लांडे महाराष्ट्रात येणार आहेत. 
 
शिवदीप लांडे हे 2006 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने त्यांनी बिहारमधील गुंड, माफियांमध्ये स्वतःची दहशत निर्माण करत गुन्हेगारीवर चाप लावला आहे. विशिष्ट काम करण्याच्या पद्धतीमुळे ते 'दबंग' शिवदीप लांडे म्हणून ओळखले जातात. शिवदीप लांडे हे राज्यातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवदीप लांडे यांनी राज्यातील दहशतवादविरोधी पथक किंवा गुन्हे अन्वेषण विभागात काम करावे, अशी इच्छा काही दिवसांपूर्वी शिवतारे यांनी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे आता राज्यात शिवदीप लांडे यांची कुठे वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.