दीपक केसरकर राष्ट्रवादीचेच आमदार

By Admin | Updated: May 30, 2014 02:20 IST2014-05-30T02:20:51+5:302014-05-30T02:20:51+5:30

आ. दीपक केसरकर यांच्यावर पक्षाने नोटीस बजावली असली तरी ते राष्ट्रवादी कॉंंग्रेसचेच आमदार असल्याचा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़

Deepak Kesarkar is the MLA of NCP | दीपक केसरकर राष्ट्रवादीचेच आमदार

दीपक केसरकर राष्ट्रवादीचेच आमदार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात प्रचार केल्याने आ. दीपक केसरकर यांच्यावर पक्षाने नोटीस बजावली असली तरी ते राष्ट्रवादी कॉंंग्रेसचेच आमदार असल्याचा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़ निवडणुकीत राणेविरोधी भूमिका घेतल्यामुळे आ. दीपक केसरकरांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, त्यांना पक्षाच्या व्यासपीठापासून दूर ठेवण्यात आले. आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे डॉ. विजयकुमार गावित यांचे मंत्रिपद काढून घेतले, आ. विनायक मेटे यांच्या निलंबनाची शिफारस राष्ट्रवादीने केली. मात्र, दीपक केसरकरांना नोटीस देण्यापलीकडे काही केले नाही. याबाबत विचारले असता जाधव म्हणाले की, केसरकरांप्रमाणे अनेकांना पक्षाने नोटीस बजावली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. पण, केसरकर राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त ८ जून रोजी षण्मुखानंद सभागृहात मेळावा होत आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी २० प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सरकार आणि संघटनेतील काम, पक्षाची पुढील वाटचाल याबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Deepak Kesarkar is the MLA of NCP