शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण निर्णायक टप्प्यावर

By admin | Updated: October 10, 2014 05:23 IST

लोकसभा निवडणुकीत पूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेल्या पराभवामुळे खचलेल्या माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे

लोकसभा निवडणुकीत पूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेल्या पराभवामुळे खचलेल्या माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान उभे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन मतदारसंघापैकी दोन ठिकाणी स्वत: राणे आणि त्यांचे दुसरे पूत्र नीतेश राणे नशीब आजमावत असल्याने राणेंसाठी ही लढाई अस्तिवाची बनली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील राजकारण खऱ्या अर्थाने निर्णायक टप्प्यावर असून या निवडणुकीतच आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास पाहता गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांनी जिल्ह्याचे राजकारण सतत आपल्याभोवती फिरणारे ठेवले आहे. १९९0 पासून सन २00५ पर्यंत म्हणजे शिवसेनेत असताना आणि त्यानंतर गेली दहा वर्षे काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे याबाबत समीकरणच जुळलेले आढळून आले आहे. या समीकरणाला मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीने पहिल्यांदा छेद दिला आहे. मोदी लाटेवर स्वार होवून माजी खासदार नीलेश राणे यांचा दारूण पराभव करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या रूपाने शिवसेनेला पुन्हा वैभव मिळाले आहे. नीलेशच्या पराभवामुळे राणे व्यथितही झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पुन्हा नव्याने दमाने उतरले आहेत. त्यामुळे यावेळची लढाई फार निर्णायक होणार आहे. त्यातच त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचारसमितीप्रमुख पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्यासाठी राज्यभरात प्रचाराचे आणखीन एक आव्हान आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. यात गतनिवडणुकीत कणकवली मतदारसंघात भाजपाचे प्रमोद जठार, कुडाळमधून काँग्रेसचे नारायण राणे आणि सावंतवाडीमधून राष्ट्रवादीचे दीपक केसरकर निवडून आले होते. आता विधानसभेच्या आखाड्यात हे विद्यमान तिन्ही आमदार पुन्हा एकदा नशिब अजमावत आहेत. मात्र, दीपक केसरकर मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार झाले होते. आता ते शिवसेनेकडून रिंगणात आहेत.कणकवली मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. येथे भाजपातर्फे प्रमोद जठार यांच्यासमोर काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचे सुपूत्र नीतेश राणे युवानेतृत्व म्हणून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे आणि शिवसेनेतर्फे सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर आखाड्यात उतरले आहेत. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून आमदार विजय सावंत यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. याठिकाणी जठार यांना पुन्हा संधी मिळते की नीतेश राणे पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ-मालवणमध्ये लढत ही नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात समोरासमोर होत आहे. मात्र, या ठिकाणी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते पुष्पसेन सावंत यांनी उडी घेतल्याने आणि भाजपानेही विष्णू मोंडकर यांच्या रूपाने उमेदवार उभा केल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार आहे. त्या मतविभागणीचा फायदा कोणाला होणार यावर बहुतांशी गणिते अवलंबून असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत २१ हजारांचे मताधिक्य येथे शिवसेनेला मिळाले होते. परंतु यावेळी नारायण राणे सातव्यांदा येथे रिंगणात असल्याने येथे कोण बाजी मारणार याबाबत तर्क करणे अवघड बनले आहे. सावंतवाडीमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग या तीन तालुक्यांचा समावेश होतो. याठिकाणची लढाई मात्र स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून केसरकर यांचे समर्थक असलेले दोडामार्गचे नेते सुरेश दळवी, भाजपाकडून नारायण राणेंचे एकेकाळचे विश्वासू शिलेदार राजन तेली व जिल्ह्यातील एकमेव जागा लढणाऱ्या मनसेकडून परशुराम उपरकर हे रिंगणात असल्याने खऱ्या अर्थाने केसरकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे आहे. तीन माजी आमदारांमध्ये ही लढत होत आहे. त्यामुळे सावंतवाडीतील लढत केसरकरांचे अस्तित्व पणाला लावणारी ठरली आहे.